किनवट/प्रतिनिधी: भारत जोडो युवा अकादमी संचलित, साने गुरूजी रुग्णालय व संशोधन केंद्र किनवट येथे दी रोटरी फाऊंडेशनच्या आर्थिक सहकार्याने नवजात शिशु अतिदक्षता विभाग व खास या भागातील गरोदर मातांच्या तपासणीसाठी रोटरी कल्ब ऑफ पुणे सहवास यांच्याकडून प्राप्त झालेले MUMMY (Multi Utility Mobile Medical Yaan) अर्थात फिरता दवाखान्याचे लोकार्पण दिनांक 28 ऑक्टोबर रोटरी इंटरनॅशनलचे प्रांतपाल स्वाती हेरकळ व सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी भागातील बालमृत्यु व कुपोषण कमी होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे हे दोन्ही प्रकल्प किनवट येथे भारत जोडो युवा अकादमी संस्थेतर्फे साने गुरूजी रूग्णालय येथे डॉ. बेलखोडे यांच्या प्रयत्नातून व रोटरी क्लबच्या आर्थीक सहाय्यातून सुरू होत असल्याबद्दल कौतुक करीत या प्रकल्पामुळे मृत्युदर नक्कीच कमी होईल असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्यक्त केला व दोन्ही प्रकल्पासाठी शुभेच्छा देत गरज असेल तेव्हा शासकीय व प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले.
रोटरीचे प्रांतपाल श्रीमती स्वाती हेरकळ यांनी साने गुरूजी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी आपले आयुष्य आदिवासींच्या सेवेसाठी दिल्याचा विशेष उल्लेख करीत रोटरीच्या मदतीतून हा प्रकल्प साकार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातही अशाच प्रकारची मदत रोटरी क्लब तर्फे केल्या जाईल याचे सुतोवाच केले.
या प्रसंगी समीर कुलकर्णी, पुणे डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, श्री. सुधीर लातूरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी पुणे रोटरीच्या अध्यक्षा प्रतिभा जगदाळे, श्री. किरण इंगळे नांदेड रोटरीचे उमेश गरूडकर, डॉ. अश्वीन लव्हेकर, मुरलीधर भुतडा, श्री गोपाल बंग, डॉ. बी. आर. मालू, डॉ. संजय पतंगे, श्री. प्रविण पाटील, श्री. राहूल गांधी, निसर्गमित्र मुरलीधर बेलखोडे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, सचिव श्री. माधव बावगे किनवटचे माजी नगराध्यक्ष ईसाखान सरदार खान, के.मुर्ती, नारायणराव सिडाम, मुक्तीराम घुगे, तालुका आरोग्य अधिकारी, के.पी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. आईटवार, डॉ. सागर शिल्लेवार, ॲङ मिलींद सर्पे, प्रदिप वाकोडीकर, गोकुळ भवरे, भूमन्ना बोल्लेवार, डॉ. इंद्रायणी केंद्रे, भारती साबळे, अमित चिन्नावार, शिवाजी बरबडकर, संतोष चनमनवार, उदय गंधेवार, कु. अश्विनी उईके, यांच्यासह साने गुरूजी रूग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. माधव बावगे व किशोर पावडे यांनी केले तर नांदेड रोटरीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.