*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२७.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या निर्देशानुसार आणि सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अशोक जाधव यांच्या मान्यतेनुसार काँग्रेस पक्ष प्रणित सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या नांदेड च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महासचिव तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरदार रणजीत सिंघकामठेकर हे होते तर व्यासपीठावर सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष
डॉ.गंगाधर सोनकांबळे,स.दर्शन सिंघ मोटरवाले,स.नरेंद्र सिंघ चंडोल (माजी नगरसेवक पटियाला) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी सत्कार मूर्ती म्हणून सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे,उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे,अशोक कांबळे, खंडेराव हसनाळकर,गंगाधर फुगारे,अशोक सावंत, महासचिव किशनराव रावणगांवकर,स.राजकमल सिंघ,गाडीवाले,संजीव कुमार गायकवाड,कामाजी आटकोरे, अनिल उबाळे,राजेंद्र वाघमारे, कोषाध्यक्ष अविनाश निखाते व शहराध्यक्ष कुपटीकर या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार निष्काम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सरदार राजकमल सिंघ गाडीवाले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरदार राजकारण
सिंघ गाडीवाले म्हणाले की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील सर्व घटकाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसेच देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सरदार भगतसिंग,राजगुरू,सुखदेव व महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा चिखलवाडी कॉर्नर येथे बसवण्याची मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे केल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गंगाधर सोनकांबळे बोलताना म्हणाले की नांदेड ही गुरुगोविंद सिंग जी महाराजांची पवित्र भूमी आहे आणि त्यांनी दिलेल्या संस्कारातूनच आपल्याला समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून आपल्याला स्वाभिमान मिळाला व खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय जोपासण्याचे काम आपल्याला संविधानाच्या माध्यमातून करायचा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणात सरदार रणजित सिंघ
कामठेकर म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला नांदेड जिल्हा महासचिव करून काँग्रेस पक्ष संघटन वाढवण्यासाठी व मा.अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी संधी दिली त्यांचे मी सदैव ऋण व्यक्त करून.काँग्रेस पक्ष वाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरदार राजकमल सिंह गाडीवाले यांनी केले.
यावेळी मनजीत सिंग टूटेजा,उपेंद्र सिंग सुखी,अर्जुन सिंह मुनिम,दीपक सिंह गाडीवाले,हरबंस सिंह वासरीकर,जगजीवन सिंह, इंद्रजीत सिंह,सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष सरदार हर्जिंदर सिंह संधू यांच्यासह अनेकांची
उपस्थिती होती.