KINWATTODAYSNEWS

मराठा आरक्षण मिळेपर्यंत कामठाला ग्रामपंचायत क्षेत्रात राजकीय नेत्यांना गावबंदी, ग्रामपंचायत मध्ये ठराव संमत

किनवट ता.प्रतिनिधी:
सध्या मराठा आरक्षणाचे वारे जोराने होऊ लागले आहेत किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे सूचक आणि सुचविले अनुसार महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागणी चालू आहे व प्रत्येक वेळी राजकीय पुढारी कडून फक्त आश्वासन दिले जात आहे तरी मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण ोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कमठाला ग्रामपंचायत अंतर्गत कमठ्याला गणेशपुर व अंतर्गत सर्व गावात राजकीय पुढार्‍यांना नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात यावी याविषयी सभेत चर्चा झाली व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
या प्रसंगी कमठाला येथील सरपंच अनुसयाताई तडसे , उपसरपंच बालाजी भरकड , कैलास पाटील यांच्या सह सदस्यांनी ठराव घेतला . तेव्हा उपस्थित उत्तम पाटील , शिवाजी पाटील , मारोतराव सुरोशे , घनश्याम कराळे , संतोष भरकड , लक्ष्मण देवसरकर ,मारोती बाराटे , मारोती तवरकर , युवराज कराळे , अमोल कराळे , विशाल कराळे , बाळू कराळे , शंकर कोहचडे आदी उपस्थित होते.

193 Views
बातमी शेअर करा