परभणी: सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती(SCRCC) च्या वतीने परभणीत सात नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग नेमवा अशी मागणी करण्यात येणार आहे.
परभणी शहरातील सावली विश्राम गृहात सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC) ची बैठक रविवारी 22 आक्टोबर रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उप प्राचार्य प्रा. डॉ. ए. टी. अवचार होते. आजच्या बैठकीत परभणी जिल्हा कार्यकारणी निवडली. परभणी जिल्हा मुख्य संयोजक कुणाल गायकवाड तर जिल्हा संयोजक म्हणून एल. डी. कदम, रमेश गुज्जर मोहिते, अनिल मोहिते, राम मेंडके, कारभारी कांबळे, माऊली साळवे, शेषद्री मोरे, ए. टी. अवचार, बालाजी क्षीरसागर, अशोक उबाळे, जी. जी. गायकवाड, वामनराव अवचार यांना सकल चे राज्य संयोजक सतीश कावडे, परमेश्वर बंडेवार, संतोष पवार, अण्णासाहेब तोडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे दिली.
सूत्रसंचालन अविनाश मोरे यांनी, प्रास्ताविक कॉ. गणपत भिसे, आभार प्रदर्शन माऊली साळवे यांनी केले. बैठकीला अजित शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, उत्तम गोरे, विकास गोरे, चांदुराम बोराडे, रोहिदास नेटके, प्रकाश गायकवाड, किशोर कांबळे, कमलेश क्षीरसागर, सतीश मस्के, हेमंत साळवे, रोहिदास लांडगे, आनंद लोखंडे, पप्पू वाघमारे, मल्हारराव तोटरे, के. के. भारसाकळे, वैजेनाथ पवार, सुरेश क्षीरसागर, शिवाजी कांबळे, भागवत जलाले, कोंडीराम खंदारे, अंकुश कांबळे, आश्रोबा उफाडे, अण्णाभाऊ उबाळे,निवृत्ती दादा नितनवरे, राजू मगर, कुणाल भारसाकळे, प्रदीप भिसे, बालाजी कांबळे, अमोल कांबळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सात नोव्हेंबर रोजी परभणीत आयोजित महा धरणे आंदोलन लक्षवेधी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.
सात नोव्हेंबर रोजी परभणीत ‘सकल’ चे आंदोलन
105 Views