KINWATTODAYSNEWS

. भिमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांच्या आहवान व प्रयत्नामुळे आज किनवट माहुर तालुक्यातील वाडी तांड्यामध्ये लसीकरण मोहिमेने घेतला वेग

किनवट ता प्र दि ०९ लसीकरणा बाबत आदिवासी व बंजारा समाजा बाबत अनेक गैरसमझ होते जसे हा देवीचा प्रकोप आहे , देव कोपला आहे वगैरे वगैरे परंतु आ. भिमराव केराम व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांच्या आहवान व प्रयत्नामुळे आज किनवट माहुर तालुक्यातील वाडी तांड्यामध्ये लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे.
किनवट तालुक्यातील आदिवासी पाड्यात अनेक गैरसमझ असल्याने लस घेण्यासाठी फारसे कोणी समोर येत नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाने आदिवासी गोंडी कोलाम, बंजारा व सीमावर्ती भागात तेलगू भाषेत ऑडियो, व्हिडीओ गीत तयार करण्यात आले. मंदिर, फिरत्या एलईडी वाहन आणी सोशल मिडीयावर या गीतांचे प्रसारण करत आदिवासी बांधवांना लसीचे महत्व पटवुन देण्यात आले. परिणामी आतापर्यंत ४२ हजार ६४६ जणांचे लसीकरण झाले.
“कोरोना ता लस येता रा दादा….” या गोंडी, तर कोरोनार लस ले लो तू भाया रे … या बंजारा गीतांनी नागरीकांचे लक्ष वेधले आहे. किनवट , माहुर तालुल्यात आदिवासी गोंडी कोलामी, बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्याच बरोबर , सिमावर्ती भागात तेलगु बोलणारा वर्गही मोठा आहे.
२२ कोलामपोडा आहेत या ठीकाणी लसीकरणाचे प्रमाण सुरवातीला शुन्य होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात गेल्यानंतर कोणी लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. नागरीकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाले होते. त्यांना महत्व पटवुन ही प्रशासनाला यश मिळत नव्हते. ही बाब लक्षात आल्यावर सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांच्या संक़ल्पनेतुन एक थीम तयार करण्यात आली.
गोंडी, बंजारा, तेलूगु, भाषेत तयार करुन कोरोना जनजागृती कार्यक्रमाची आखणी केली. गावातील मंदिर, सोशल मिडीयावर याचे प्रसारण करण्यात आल्याचे किनवट तालुका आरोग्य अधिकारी डॉ मुरमुरे यांनी सांगितले. तर या मोहिमेत गटशिक्षण अधिकारी अनिल महामुने हे प्रमुख तर सुरेश पाटील यांनी सुरेख गिते लिहली तर तेलगु मध्ये इंदुरकर यांनी गिते लिहली आहे.

89 Views
बातमी शेअर करा