*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.सामाजिक न्याय विभाग जिल्हा काँग्रेस नांदेडच्या वतीने नांदेड जिल्हा शहर व तालुक्यातील पदाधिकार्यांची कार्यकारिणी घोषित करून त्यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.
काँग्रेस कमिटी जिल्हा कार्यालय नवा मोंढा येथे सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव यांच्या मान्यतेनुसार नांदेड जिल्ह्यातील शहर व तालुका पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजीमंत्री डी.पी.सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर,मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,प्रदेश सरचिटीस सुरेंद्र घोडजकर,प्रदेश सचिव श्रावण रॅपनवार,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष डॉ.गंगाधर सोनकांबळे,एस.सी.विभाग मनोहर पवार,युवानेते रवींद्र चव्हाण,प्रदेश उपाध्यक्षा (महिला) रेखाताई चव्हाण, प्रफुल्ल सावंत,विठ्ठल पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश व सामाजिक न्याय विभागाच्या नूतन पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे,उपाध्यक्ष- निवृत्ती कांबळे, अशोक कांबळे, के.एच.हसनाळकर,गंगाधर फुगारे,अशोक सावंत,यांची तर जिल्हा महासचिव-अनिल उबाळे,राजेंद्र वाघमारे,कामाजी अटकोरे,संजीवकुमार गायकवाड,राजकमलसिंघ गाडीवाले,किशन रावणगावकर,यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अविनाश निखाते, सचिव- शिवाजी सूर्यवंशी,राहुल आठवले,सुशीलकुमार देगलूरकर,तालुकाध्यक्ष- अनिल थोरात अर्धापूर,देवदत्त हटकर मुदखेड,चंद्रभीम हौजेकर धर्माबाद,भास्कर जनकवाडे नांदेड,डी.एस.सरोदे भोकर, जोगेंद्र नरवाडे हिमायतनगर, माधवराव ढगे उमरी,संजय सोनकांबळे मुखेड,राजेंद्र मंडणीकर देगलूर,प्रकाश पोवाडे बिलोली,दिगंबर मेकाले लोहा, बालाजी ढाकणे कंधार,सुनील डुमणे नायगाव,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार किनवट,प्रमोद राठोड माहूर,गजानन कंठाळे हदगाव आदी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सामाजिक न्याय विभाग काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम केले पाहिजे व सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन तसेच पक्षशिस्त पालन करून नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे,असे आवाहन करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गंगाधर सोनकांबळे यांनी कार्यक्रमाची भूमिका आपल्या प्रास्ताविकेतून मांडली व सर्वांचे आभार मानले.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे शहर,तालुका काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.