लोहा- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरला येथे १९ आॕक्टोंबर रोजी शाळेच्या मैदानात मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निपुन भारत अभियानातंर्गत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरी च्या माता- पालकाचा आनंददायी कृतीयुक्त उत्सव घेण्यात आला.
या उत्सवाचेअध्यक्ष निपुन भारत ,लातूर विभाग प्रमुख गोविंद पौळ तर प्रमुख पाहुणे लोहा पंचायत समितीचे अभ्यासू साधन व्यक्ती बालाजी कातूरे हे होते .यावेळी अध्यक्षीय समारोप करताना गोविंद पौळ,यांनी निपुन भारत घडविण्याची कार्य पध्दती त्यासाठी तयार करण्यात आलेली शैक्षणिक व्हिडिओ,साहित्याचा वापर ,पालकाची भूमिका ,शिक्षकाची कामे सांगितले .आनंददायी शिक्षण व कृतीयुक्त शिक्षण निश्चितच भविष्य घडविल.उपस्थित महिलांना आनंददायी कृतीयुक्त खेळ यावेळी घेण्यात आला.केंद्रप्रमुख व्यंकटेश केंद्रे यांनी जागृत माता पालकाच्या प्रेरणेतून पाल्याची चांगली जडणघडण होते .त्यासाठी मातापालकांनी पाल्याच्या भविष्याची काळजी घेण्याचे आवाहन केले .प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पुजन करून राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे यांनी आपल्या प्रास्तविकात शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगून विविध शैक्षणिक उपक्रमातून शाळेची गुणवत्ता वाढल्याचे सांगितले .इयत्ता पहिलीची वर्ग शिक्षिकेच्या मेहनतीतून शंभर टक्के मुले जोडअक्षरासह खाडखाड पुस्तक वाचन व सोप्या गणिती क्रिया करतात ते सांगितले . उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सौ.अंजली भंडे,सौ.दिपाली सनपूरकर,सौ.सारीका बोधनकर यांनी परिश्रम घेतले . सुरेख सुत्रसंचलन पदविधर शिक्षक उत्तम क्षीरसागर यांनी तर आभार सो.अंजली भंडे यांनी केले .शाळेच्या मैदानावर भरपूर यथोचित्त रांगोळ्याची सजावट करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होत्या.
डेरला शाळेत निपुण उत्सव
267 Views