KINWATTODAYSNEWS

सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती(SCRCC)महाराष्ट्रराज्य. संयोजन समितीची पहिली राज्यस्तरीय बैठक नांदेड येथे संपन्न.

नांदेड :अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण ही काळाची गरज आहे. ही वर्गवारीची लढाई एका विशिष्ट जाती पुरती मर्यादित राहू नये. ही भूमिका घेऊन आरक्षणाच्या समान लाभापासून वंचित राहिलेल्या इत्तर अनुसूचित जाती व त्यांच्या उप जाती यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी “सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC) महाराष्ट्रराज्य या समितीची स्थापना दि.०७ आक्टोबर २०२३ रोजी लातूर जि. लातूर येथे झाली.
समितीचे ध्येय धोरण, उद्देश, कार्यप्रणाली, नियमावली बनवणे. कार्यकारी मंडळ बनवणे. संयोजक व प्रमुख राज्य समन्वयक निवडणे. व त्याना सभेतून मंजुरी देणे. आणि ते सर्व सर्वांसमक्ष अधिकृपने जाहीर करणे. यासाठी दि.१५-१०-२०२३ रविवार रोजी “सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती ” महाराष्ट्रराज्यची ही महत्वपूर्ण पहिली राज्यस्तरीय बैठक नांदेड येथे घेण्यात आली.
सदरील बैठक दुपारी ०१ ते सायं.०६ वाजेपर्यंत अगदी नियमित आणि निर्विवादपने कॉ. गणपत भिसे यांच्या अध्यक्षतेखाली चालली.
बैठकीची सुरुवात भारतीय घटनाकार प. पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सभागृहात संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने लोकनेते मा. आमदार स्व. मधुकरराव कांबळे साहेबांना आदरांजली वाहण्यात आली.
व त्याच बरोबर समाजाचे धुरंधर पत्रकार रंगकर्मी सुरेश मस्के यांचे परवा अकाली निधन झाले.त्यांनाही सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.व त्यानंतर बैठकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
सदरील बैठकीसाठी महाराष्ट्रातील नांदेडसह इत्तर सात (०७) जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला मांग /मातंग जातीशिवाय कैकाडी, हिंदू खाटीक ह्या जातीचे प्रतिनिधी यांनी आवर्जून उपस्थिती लावली. सदरील राज्यस्तरीय बैठकीमध्ये मुख्य संयोजक कॉ.गणपत भिसे, प्रा. डॉ. सुशील प्रकाश चिमोरे, प्रा. रणधीर कांबळे आणि लेखक केशव शेकापूरकर यांनी मार्गदर्शन केले.सकल अनु. जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC) ची संकल्पना, ध्येय,उदिष्ठ आणि कार्य या सर्व बाबीची स्पष्टता केली.
काही ठरावही मांडले.
या ठरवाला सभागृहाने हात उंचावून व टाळ्या वाजवून समंती दिली.

बैठकीत मुख्य संयोजक यांचेकडून “सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC) विषयीची स्पष्टता…
– सकल अनुसूचित आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC)महाराष्ट्रराज्य ही समिती या पूर्वी आरक्षण वर्गीकरण लढ्यासाठी कार्य करत असलेल्या कोणत्याही समितीला पर्याय वा विरोध म्हणून स्थापन केली नाही.
– या पूर्वी कार्यरत असणाऱ्या सर्व समिती व संघटना वेगळ्या असून त्यांनाही सहकार्य करेल.
– ही समिती केवळ सकल अनु. जाती आरक्षणाचे
अ ब क ड वर्गीकरण हाच एक विषय घेऊन शासन व सरकारशी लढेल.
-राज्यातील आरक्षणाचा समान लाभ न मिळालेल्या वंचित अनु. जाती चे एकीकरण करण्यासाठी “अनु.जाती जोडो अभियान” महाराष्ट्रभर राबवेल.
– अ ब क ड वर्गीकरण केलेच पाहिजे यासाठी किमान एक लाख सकल अनु. जातीचा भव्य मोर्चा करेल.
– समाजसेवी काम करणाऱ्या कोणत्याही संघटना, समिती वा व्यक्ती यांना विरोध करणार नाही.
पण,
– राजकीय हेतूने प्रेरित असणाऱ्या व्यक्ती, संघटना, समित्या यांच्यापासून दूर राहण्यावर ठाम असेल.
– जो पर्यंत सरकार अनु. जाती आरक्षणाचे अ ब क ड असे वर्गीकरण करणार नाही, तो पर्यंत ही समिती कार्यरत राहील.
सदरील बैठकीत….
कॉ. गणपत भिसे यांची मुख्य समन्वयक तर रणधीर कांबळे यांची उप मुख्य समन्वयक म्हणून सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली.
कार्यकारी मंडळ ही बनवन्यात आले.
आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी प्रत्येक संयोजकाने ५००रु प्रति महिना निधी समितीस द्यावा असे ठरले.
निधी संकलन करण्याची जबाबदारी प्रमुख म्हणून मा. शिवा कांबळे सर यांची निवड करण्यात आली आहे.

ही समिती
अनु.जातीतील सर्व ५९ जातींना या वर्गीकरणाच्या लढ्यात समाविष्ट करण्यासाठी अविरत कार्य करेल.
असे सर्वानुमते ठरले.
अशा प्रकारे ही “सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC )संयोजन समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे आयोजन नांदेड येथे करण्यात यावे असे मुख्य संयोजकांची विनंती होती.
त्याप्रमाणे जेष्ठ नेते समाजभूषण आदरणीय सतीश कावडे साहेबांनी ही जबाबदारी स्वीकारून ही बैठक चहा, बिस्कीट, पाणी आणि सायंकाळचे जेवनासह ही बैठक यशस्वी पार पाडली.

त्याबद्दल मुख्य संयोजक व उपस्थित संयोजकांनी सतीश कावडे यांचे आभार मानले.
या बैठकीचे अध्यक्ष कॉ. गणपत भिसे होते. तर मा. सतीश कावडे यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सूत्रसंचालन परमेश्वर बंडेवार यांनी केले.
बैठक यशस्वीतेसाठी मा.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सन्माननीय शिवा कांबळे सर, मल्हारराव तोटरे सर, सेवा निवृत डॉ. गणपत जिरोणेकर, डॉ. माधव लोकडे सर, पिएसआय एन डी रोडे सर,नागराज आईलवार सर, नायगाव नगरीचे समाजनेते रवींद्र भालेराव साहेब, राजेश कावडे सर आणि नागराज तादलापूरकर या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.
एकमेकां साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ!!
शब्दांकन
परमेश्वर बंडेवार
राज्य संयोजक
सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती (SCRCC)महाराष्ट्रराज्य.

208 Views
बातमी शेअर करा