किनवट ता.प्रतिनिधी: कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट जिल्हा नांदेड च्या संचालक मंडळपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 18 पैकी 14 उमेदवार जिंकून आल्यामुळे किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात माजी आमदार प्रदीप नाईक यांना यश प्राप्त झाले आहे.
तर भाजप काँग्रेस युतीला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात भाजपाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत.
किनवट /माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर, माहूर पाठोपाठ किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.
त्यामुळे पुन्हा या मतदारसंघात “राष्ट्रवादी पुन्हा” हेच चित्र दिसून येत आहे. अगदी काही महिन्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रदीप नाईकने तिनही कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा रोवून आपले पाय मजबूत केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत घेण्याच्या मार्गाने वाटचाल करीत आहे.
आमदार प्रदीप नाईक हे फायर ब्रँड नेते ठरत असून एका मागोमाग एक समित्या जिंकून सहकार क्षेत्रात आपले पाय मजबूत केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका या राष्ट्रवादीसाठी अगदी सोप्या ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे .
भाजप व काँग्रेसने माहूर आणि किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (अनैसर्गिकअभद्र युती) केल्याने सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य मतदारांना रुचली नाही त्याचाच परिणाम आज समोर आला आहे.
देशात मा.राहुल गांधी, खडगे सोनिया गांधी हे कोणत्या मार्गाने जात आहेत व माहूर किनवट तालुक्याची काँग्रेस कोणत्या मार्गाने जात आहे हे सर्व सामान्य जनतेला पटलेलं दिसत नाही.
किनवट /माहूर मतदारसंघात भाजपाची सत्ता असून येथील आमदार मा.भीमराव केराम हे आहेत परंतु किनवट/माहूरच्या जनतेने या निवडणुकीत भाजपला सपशेल नाकारत एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या आहेत तर भाजप-काँग्रेसचे युतीचे एकूण चारच जागा निवडून आल्या आहेत.
मतदारांनी अभद्र युतीला खड्यासारखे बाहेर काढून टाकले आहे. व पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली आहे.
निवडून आलेले नवीन संचालक मंडळ-
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ
1) सातव प्रल्हाद तुकाराम मोहपुर.
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ 1) बालाजी गोविंद बामणे मलकवाडी 2) अनिल संभाजी कराळे कंमठाला 3) श्रीराम माणिकराव कांदे पारडी खुर्द 4) प्रेम सिंग रामजी जाधव अंबाडी तांडा 5)गजानन गोविंदराव मुंडे बोधडी बु. 6) सोपान ज्ञानोबा केंद्रे बोधडी 7) शेख हैदर मुसा गोकुंदा
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
1)अनुसया मनोहर पेंदोर घोगरवाडी
हमाल मापारी मतदारसंघ
1) खिच्ची अब्दुल सत्तार अब्दुल रमजान किनवट
व्यापारी अडते मतदार संघ
1)प्रेमसिंग बदलू साबळे डोंगरगाव तांडा 2)कैलास अशोक बिजमवार बोधडी बु.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
1)राजू लक्ष्मण सुरोशे घोटी
2)सुनील लक्ष्मण घुगे बोधडी बु.
ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार
1)राहुल गेमसिंग जाधव (नाईक)
सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्यात जमाती
1)नवीन अशोक राठोड मांडवी
सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ
1)विद्याताई संतोषदासरवार मांडवा
2)कुसुम गणपत मुंडे निचपुर
आदी निवडून आले आहेत. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे किनवट तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट वर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा 18 पैकी 14 जागा जिंकण्यात माजी आ.प्रदीप नाईकांना यश.नाईक ठरले फायर ब्रॅंड नेते.
110 Views