KINWATTODAYSNEWS

क्रांतिवीर लहुजी नगर येथील विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले समितीचे पदाधिकारी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार —- संजय वैरागडे

वाशीम : स्थानिक क्रांतिवीर लहुजी नगर समितीचे वतीने ता. ९ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले क्रांतिवीर लहुजी नगर विकास समितीचे पदाधिकारी विविध मागण्याकरिता जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करून समस्या बाबत चर्चा केले. यावेळी क्रांतिवीर लहुजी नगर विकास समितीचे अध्यक्ष संजय वैरागडे यांचे नेतृत्वात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. क्रांतिवीर लहुजी नगर येथील मोडकळीस आलेले घरांचे मजबुतीकरण करून मिळावे. घरकुल मंजूर लाभार्थ्यांना घरकुले नावावर करून द्यावे .क्रांतिवीर लहुजी नगर येथे पथदिवे बसविण्यात यावे. उघड्यावर साचलेली घाण, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून डास,मछर , होऊन आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे तात्काळ साफसफाई करावे. तसेच सौचालायाचे चेंबरचे झाकणे तुटून संडासच्या दुर्गंघीयुक्त घाणपाणी उघड्यावर सांडून ,तुडुंब भरल्याने आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे तात्काळ नाल्या व चेम्बर साफ करून त्यावर झाकण बसविण्यात यावे व नाल्या साफ करून करून मिळावे यामागण्याकरिता क्रांतिवीर लहुजी नगर येथील क्रांतिवीर लहुजी नगर विकास समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्यासंख्येने हजार होते. व्ही सी रूम चे मीटिंग हॉल मध्ये सविस्तर सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी मॅडमने एका महिण्यात क्रांतिवीर लहुजी नगर येथील समस्या दूर करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. चर्चा करताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, अभियन्ता घुले यांचे आहे क्रांतिवीर लहुजी नगर विकास समितीचे अध्यक्ष संजय वैरागडे, कोषाध्यक्ष रंजना पौळकर, तर कार्येकर सदस्य विनोद खडसे,राजू इंगोले, शेख शाहरुख , छायाताई जाधव, हिराताई जाधव, ललिता इंगोले, बेबी खंदारे, रेखा पातोडे,पार्वती पाटोळे, सुनीता उद ,शेषिकाला पाटोळे, रुक्सना शेख, अन्नपूर्णा पोहेकर, लीलाबाई पुंडगे, विजू लबडे, बेबी भालेराव ,मीरा गवळी , सुमन डोंगरे, भागाबाई तुपसुंदर, छाया लबडे यांचे सह मोठ्या संख्येने समितीचे पदाधीकारी जिल्हाधिकारी मॅडमशी चर्चा करताना हजर होते. चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय झाला व निर्णयाची एका महिन्यात पूर्तता कार्याचे जिल्हाधिकारी मॅडमने सवाष्ण दिले,जर एका महिण्यात पूर्तता झाली नाही तर समितीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

57 Views
बातमी शेअर करा