अमरावती :- आज दि: ११/१०/२०२३ रोजी काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले हे अमरावती दौऱ्यावर आले असता मातंग समाजाने त्यांना साकडे घातले आगामी अमरावती लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जाती करीता राखीव उमेदवारी मातंग समाजाला प्राधान्याने देण्यात यावी या करिता मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले,
अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्या पैकी दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला मातंग समाज हा कायम उपेक्षित व वंचित राहिला आहे, सदर समाजाची व्यथा लक्षात घेऊन राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सकल मातंग समाज हा समाजातील उमेदवराच्या पाठीशी ताकतीने उभा राहून एकजुटीने लढेल अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी निवेनाद्वारे दिली आहे..
325 Views