किनवट/प्रतिनिधी: येथील गोंडराजे राजवाडा चंद्रपूल्ला रेड्डी सभागृह के के गार्डन गोकुंदा किनवट येथे अखिल भारतीय किसान मजदुर सभेचे पाचवे राज्यव्यापी अधिवेशन दिनाक 7,8 ऑक्टोंबर 2023 रोजी दोन दिवसीय आयोजित करण्यात आले होते.दिनाक 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा गोंड राजे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्गे के के गार्डन गोकुंदा येथे अखिल भारतीय किसान मजदुर सभेची भव्य रॅली काढण्यात आली.सदरील रॅलीत आदिवासी नृत्य, बंडबाजा वाजत गाजत ,इंकलाब जिंदाबाद, लाल सलामच्या घोषणानाने किनवट परिसर दणाणून सोडला होता.रॅली उपविभागीय कार्यालया वर आली असता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन जमिनीचे फेरवाटप करा, सर्व उद्गोगांचे राष्ट्रीयकरण करा , कास्त करांच्या नावे जमिनीचे पट्टे करा, अनुसुचित जाती जमाती जमीन खरेदी प्रतिबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा.भूमिहीन कुटुंबांना कुटुंबनिहाय 5 एकर जमिनीचे वाटप करा, किंनवट जिल्हा जाहिर करा व किनवट आदिवासी जिल्हा घोषित करा.
प्रतेक दिव्यांग कुटुंबांना 5 एकर जमीन द्या,आदिवासी विकास महामंडळाला 2000 कोटी रुपयांचा निधी द्या.50% पेक्षा अधिक आदीवासी लोकसंख्या असलेल्या गावाचा समावेश पेसा मध्ये करा, शेतकऱ्यांना एकरी 50000 रुपयाचे अनुदान द्या, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करा व नोकर भरती करा. श्री क्षेत्र रेणुका देवी देवस्थानच्या नावे असलेली जमीन तात्काळ कास्तकरांची नावे करा इत्यादी मागण्याचे निवेदन देऊन ही रॅली के के गार्डन येथे येऊन धडकली . के.के.गार्डन येथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. जाहीर सभेत केंद्रीय अध्यक्षा पी. तानिया,महासचिव कॉ.अशोक घा याळे, तेलंगणा महासचिव कॉ.बी. भास्कर, अर्थतज्ञ कॉ. प्रा.सदाशिव भुयारे कॉ. चंपतराव डाकोरे पाटील यांनी संबोधित केले. रॅली आणि जाहीर सभेस आदिवासी महिला पुरुष यांचा मोठा जनसागर उसळला होता.
रॅली व जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे
कॉ. अशोक घायाळे , कॉ.पी. डी. वासमवाड, कॉ. एम. टी.पाटील , कॉ. वसंत पाटील कुडमते, कॉ. चांपतराव डाकोरे पाटील, कॉ. दत्तहरी पाटील जगदंबे, कॉ. गुलाब पाटील मडावी, कॉ.पुंडलिक परचाके, कॉ. रावसाहेब बैलके, कॉ.दिलीप पाटील, कॉ. चांदू झुंजारे, कॉ. बालाजी पाटील बोरगावकर, कॉ. गंगाधर पांचाळ, कॉ. लक्ष्मण गायकवाड, कॉ.नारायण मरकंट वाड, कॉ.राम पाटील मंडला पुरकर, कॉ.साहेबराव वाघमारे, कॉ.लक्ष्मण तोटरे, कॉ. लक्ष्मण मेहतर, कॉ.अनिता पवार, कॉ. शहाणे, कॉ.पांडू रोडेकर, कॉ.विलास कुमटे, कॉ. परमेश्र्वर डावरे, कॉ.हरी मडावी, कॉ.एन बंडे पाटील, कॉ. कौशल्य ना ल्लापल्ले , कॉ. हणमंत बोडके, कॉ. पोशस्टी मदगुलवार, कॉ.गोविंद, कॉ. घायाळे आदीने परिश्रम घेतले.
प्रसिध्दी प्रमुख
कॉ.गोविंद चातगिळे
मो.9960825516
किनवट उपविभागीय कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेचा जनसागर उसळला.
281 Views