माहूर/प्रतिनिधी: माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप,काँग्रेस, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजितदादा गट तर दुसऱ्या बाजूने माजी आमदार प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस, ज्योतिबा दादा खराटे शिवसेना उद्धव ठाकरे गट, व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मध्ये अटीतटीची निवडणूक होणार असे वाटत असतानाच महाविकास आघाडी ने आघाडी घेत भाजप काँग्रेस शिंदे गट ,राष्ट्रवादी अजित दादा गट चा 18 पैकी 14 जागा जिंकून धुवा उडवला.
भाजपा, काँग्रेस, सेना शिंदे गटाला 4 जागांवरच समाधान मानावे लागले.
काँग्रेसने या निकालापासून धडा घ्यावा असे जनतेतून बोलल्या जात आहे. देशपातळीवर इंडिया गटबंधन साठी राहुल गांधी, सोनिया गांधी, खडगे झटत असताना किनवट /माहूरच्या भाजपा धार्जिन काँग्रेसने भाजपासोबत युती केली ही युती सामान्य नागरिकांना रुचली पचली नाही आणि लगेचच निकालातून दाखवून दिले या निकालातून काँग्रेस काही धडा घेणार का? असा सवाल जनतेतून होत आहे सध्या भाजपा पण आम्ही अमुक/तमुक विकास करीत आहोत असे वलग्ना करत आहे.
व येथील प्रत्येक जागा आम्हीच जिंकू आशा अविर्भावात असले तरी त्यांना फक्त 4 जागेवरच समाधान मानावे लागले आहे. सध्या भाजपाचा आमदार या मतदारसंघात आहे.
राष्ट्रवादी, सेना, माकपा पॅनल सोसायटी मतदारसंघ- जनरल विजयी उमेदवार
1) गुमानसिंग चुंगडे 246 2)मेघराज जाधव 551 3) आत्माराम भुसारे 239 दतराव मोहिते 266 4) पुरुषोत्तम एरडलावार 243 5) अनिल रुणवाल 259 6) उस्मान खान पठाण 236
ग्रामपंचायत मतदार संघ 1)
अभिजीत राठोड 258
हमाल मापारी मतदारसंघ 1)
विष्णू जाधव 29
सोसायटी मतदार संघओबीसी मतदारसंघ 1)विनोद जयस्वाल 255
विमुक्त भटक्या मतदार संघ
1) निखिल जाधव 252
महिला राखीव
1)रुक्मिणी बाई कनालवार 237
व्यापारी मतदारसंघ बिनविरोध
1) पवन जैस्वाल
2)अतिश गेंटलवार आदि 18 उमेदवार विजयी झाले आहेत.
विजय सर्व उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदीपजी नाईक व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा दादा खराटे तसेच माकपचे नेते कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकित (राष्ट्रवादी, उबाठा, भाकपा) आघाडीचा दणदणीत विजय तर (भाजप/काँग्रेस/शिंदे) गटाचा उडाला घुव्वा.
1,416 Views