डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय मा.ना.श्री. अशोकराव चव्हाण साहेबांनी
तात्काळ एका तासामध्ये घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि याठिकाणी नर्सिंग स्टाफ, सफाई कामगार, कर्मचारी आणि औषधांची कमतरता असल्याचे समजले. रुग्णांची वाढती संख्या पाहता या बाबींची पूर्तता होण्यासाठी शासकीय स्तरावर प्रक्रियेस काही कालावधी लागणार असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक होते. साहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जास्तीत जास्त मदत करण्याचे आणि विशेषतः अपुरा डॉक्टर, नर्सिंग स्टाफ कसा उपलब्ध करता येईल याच्या सूचना दिल्या होत्या. साहेबांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ५० जणांचा नर्सिंग स्टाफ आणि रुग्णालयास आवश्यक औषधांचा साठा प्रशासनास पुरवण्यात आला. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनास जेवढे दिवस आवश्यक आहे तेवढे दिवस हा नर्सिंग स्टाफ आणि जीवनावश्यक औषधे काँग्रेस पक्ष देणार आहे.यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, आ. मोहनराव हंबर्डे,अधिष्ठता वाकोडे साहेब,डाॅ. अंकूश देवससरकर,संतोष पंडागळे, प्रशासकीय अधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
अशोकराव चव्हाणांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने आज ५० जणांचा नर्सिंग स्टाफ आणि रुग्णालयास आवश्यक औषधांचा साठा प्रशासनास पुरवण्यात आला
216 Views