KINWATTODAYSNEWS

कंत्राटी भरती करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. प्रचंड मोर्चा मोर्चाचे निवेदन उपविभागी कार्यालयाला सादर

किनवट तालुका प्रतिनिधी :
बाहययंत्रणेद्वारे एकूण 338 संवर्गाची कंत्राटी भरती करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमाच्या 62000 शाळा दत्तक शाळा योजना मार्फत राबविण्याचा शासन निर्णय रद्द करावा. विविध पद भरती प्रक्रियेसाठी मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर एकच परीक्षा शुल्क आकारावे. सरकारी कर्मचाऱ्यांची 3 लाख रिक्त पदे त्वरित भरावीत. राज्यातील 55 हजार शिक्षकांची भरती करून ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. यासह अन्य मागण्यासाठी खाजगीकरण, कंत्रिटीकरण विरोधी कृती समिती किनवट च्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 6 ऑक्टोबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गोकुंदा येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकातून या आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला.
खाजगीकरण कंत्राटीकरण कृती समितीचे मारोती फड, प्राध्यापक दगडू भरकड, कैलास ठाकरे ,अमोल होले, प्राध्यापक जाकीर सर, प्राध्यापक विनोद मुंडे, प्राध्यापक मसलोदिन, प्राध्यापक संतोष पाटील, आणि अंकुश जाधव, शिवराज नरवडे, तरुण कॅतमवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा मोर्चा गोकुंदा येथून किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस तसेच संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले.
तेथून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हा आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला नायब तहसीलदार एन ए शेख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

338 Views
बातमी शेअर करा