KINWATTODAYSNEWS

नालीचा स्लॅप कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू;दोघांची प्रकृती चिंताजनक* जेसीबीच्या धक्क्याने अपघात घडल्याचा कंत्राटदाराचा बनाव बनाव….* माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील दुर्घटना

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.3.जिल्यातील माहूर तालुक्या मधील ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक पाच मध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांतर्गत गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मंजूर झालेल्या निर्माणाधीन नाली वरील स्लॅप कोसळल्याने एक मजुराचा गुदमरून मृत्यू झाला आहे,तर दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एकीकडे कामावरील मजूर जीवन मरणाची घटका मोजत होतो, गरीब आदिवासी कुटुंबाचा आक्रोश सुरू होता तर दुसरीकडे कंत्राटदराने मात्र जेसीबीच्या धक्क्याने स्लॅब कोसळल्याचा बनाव करण्याची संधी साधल्याने कोलामखेडा येथील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहे.

माहूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वाधिक मोठी असलेल्या ग्रामपंचायत वाई बाजारला सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामासाठी शासनाकडून लाखो रुपये मंजूर झाले आहेत.

त्या निधीमधूनच उपसरपंचाच्या नातेवाईकाच्या कंत्राटदार एजन्सी कडून गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य नालीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जात सुरू होते याविषयी माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या.परंतु उपसरपंचाच्या हेकेखोर पणाचा कळस त्यांनी कामात कुठलीही सुधारणा केली नाही.नाली बांधकाम ठेकेदाराने मजुरांना आज (ता.तीन) रोजी काल (ता.दोन) रोजी नालीवर टाकण्यात आलेल्या स्लॅबची सेंट्रींग काढायला लावली.स्लॅब मध्ये आवश्यक स्टील आणि दर्जेदार सिमेंट नसल्यामुळे स्लॅबसह जवळपास ३० फूट लांबीची नालीची भिंतही एकाच वेळेस कोसळली त्यात काम करणारे कोलामखेडा येथील संजय किशन मडावी (वय ३९) या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला तर शुभम भीमराव पेंदोर (वय २५) आणि सुमित सिताराम मरापे (वय २०) या दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याने माहूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळला रवाना करण्यात आले आहे. मयत व जखमी मजुरांच्या कुटुंबाचा आक्रोश सुरू असताना कंत्राटदाराने मात्र जेसीबीच्या धक्क्याने नालीची भिंत कोसळल्याचा बनाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालवल्याने आदिवासी मजूर कुटुंब आक्रमक झाले आहे.

*माहूर पंचायत समितीच्या बोगस कामांचे मजुराच्या मृत्यूने पितळ उघडे….*

वाई बाजार येथील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाच होत असल्याची ओरड नागरिकांनी केल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेत परंतु या बातम्यांची थोडीफार ही दखल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह अभियंत्यांनी घेतली नाही.

मुळात निकृष्ट कामाच्या तक्रारीची दखल वेळीच घेण्यात आली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती आणि एका गरीब आदिवासी मजुराचा मृत्यू झाला नसता.मजुराच्या मृत्यूला संबंधित कंत्राटदार एजन्सी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध मजुराच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक व जखमी आदिवासी कुटुंबाकडून केली जात आहे.

258 Views
बातमी शेअर करा