किनवट प्रतिनिधी: घोटी व परिसरात तापीच्या आजाराने थैमान घातले असल्याचे चित्र दिसत आहे. डेंग्यू च्या भीतीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे . प्रत्येक ग्रामपंचायतने गावातील नाल्या साफ कराव्या अशी मागणी गावातून -गावातून नागरिक करीत आहेत. किनवट शहरासह किनवट तालुक्यातील घोटी व परिसरात सध्या डेंग्यू सदृश आजाराने डोके वर काढले आहे बरेच रुग्ण ताप, सर्दी, खोकला टायफाईड, डेंग्यू ,अशा बऱ्याचशा आजाराने त्रस्त आहेत तापाची साथ पसरल्याने योग्य उपचारा अभावी ग्रासलेली आहेत.
सध्या दवाखाने तुडुंब भरलेली आहेत. सध्या औषधसाठा कमतरता असल्याचे जाणवते. यासाठी प्रत्येक घराघरात धूर फवारणी करून स्वच्छता अभियान राबवण्यात यावे अशी मागणी येथील नागरी करीत आहेत.
कोणीही अफवावर विश्वास न ठेवता स्वतः आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा व ताप आलेल्या रुग्णांना दवाखान्यात नेऊन ताबडतोब उपचार घ्यावेत यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डेंगू सदृश्य आजाराच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशत
236 Views