किनवट/प्रतिनिधी: अल्पावधीतच किनवट शहरात माहेर मॅटर्निटी अँड नर्सिंग होम च्या माध्यमातून किनवट सारख्या अति दुर्गम तालुक्यात डॉक्टर अनिल शंकर राठोड व त्यांच्या सुविध्य पत्नी डॉक्टर प्रियंका अनिल राठोड या दांपत्याने माहेर हॉस्पिटल सुरू केले असून अल्पावधीतच या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रसूती बाबतचे पेशंट भेट देत असतात.
महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी दोघांचेही शिक्षण झाले असून किनवट सारख्या दुर्गम भागात येऊन कार्य करणे ही मोठी बाब आहे.
किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागात येऊन रुग्णांना सेवा देत असल्यामुळे त्यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने या राठोड दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, युवा तालुकाध्यक्ष प्रणय कोवे, तालुका प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, डॉक्टर प्रियंका ताई यांचे वडील जाधव सर, माहेर हॉस्पिटल चा नर्सिंग स्टॉप उपस्थित होता.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नसीर तगाले यांच्या ज्येष्ठ कन्या ला पुत्री प्राप्त झाल्यामुळे ते आजोबा झालेत त्यामुळे त्यांचेही अभिनंदन याप्रसंगी करण्यात आले.