KINWATTODAYSNEWS

लोणी खुर्द येथे कालवश दलीतमित्र निवृत्तीराव लोणे यांचे 13 वे पुण्यस्मरण विविध उपक्रमानी साजरा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.24.जिल्यातील अर्धापूर तालुक्या मधील लहान-लोण येथे तपोवन बुध्दभूमीची निर्मिती करून तेथे धम्म परिषेदेला सुरुवात करणारे , जिल्ह्या मध्ये बौध्द धम्माचा प्रचार प्रसार करण्यात मोठे योगदान देणारे निवृतीराव ग्यानोबाराव लोणे यांचा काल 23 सप्टेंबर ला 13 वे पुण्यस्मरण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता.

प्रथम सत्राच्या कार्यक्रमामधे भिखु संघाकडून पूजापाठ करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात उपा.सिद्धार्थ ढोले यांच्या स्वागत गीताने झाली भीखु संघा समवेत निवृत्तीराव लोणे यांच्या अर्धांगिनी सरपंच अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे उपसरपंच संभाजी रामजी लोणे,ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण नंदोजी लोणे आदी सर्वांनी प्रतीमचे पूजन केले यावेळी पु.भ.शीलरत्न नांदेड ,पु.भ.पय्याबोधी नांदेड (श्रामनेर संघ खुरगाव),पू.भ.मुदितानंद पेडगाव, पु.भ.सुभूती तपोवन लहान लोन,पू.भ.संघप्रिय सिडको,आणि सर्व आदरणिय भीखु संघ उपस्थित होता,पिरित्त्रानपाठ आणि सर्व गाथा झाल्यानंतर भंतेजींची धम्मदेशना पार पडली

त्या नंतर रक्तदान शिबरास आणि भोजनदानाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली त्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांला सुध्दा सुरुवात होवून प्रत्येक गावातील भजनी संचानी प्रत्येकाला दिलेल्या वेळेत त्यांनी गायाने साजरी केली आणि हा कार्यक्रम रात्री पर्यंत सुरू राहिला संध्याकाळी ठीक 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहानकर सोबत जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार साहेब यांणी निवृत्तीराव लोणे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले तसेच ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत मुळे आणि सुभाष लोणे पत्रकार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वांनी निवृत्तीराव लोणे आणि कालवश संजयराव लोणे यांच्या आठवणीना उजाळा दिला या वेळी अर्धापुरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड साहेब यांनी ही आपले विचार या प्रसंगी प्रकट केले या वेळी सोबत माजी नगरसेवक पंडितराव लंगडे ,माजी.नगर अध्यक्ष उमाकांत सरोदे ,पत्रकार तथा सरपंच नीळकंठ मदने तसेच आनंदराव लोणे (कोपन दुकानदार ),एल.बी.रनखांब मा. सरपंच लहान ,गुणवंत वीरकर (अध्यक्ष पत्रकार संघ),सरपंच पंढरीनाथ बिऱ्हाडे,उत्तमराव राठोड सरपंच चेनापुर,गुणवंत सरोदे,सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पंडित ,काँग्रेसचे सुनील लोहकरे पाटील ,पत्रकार गंगाधर सोनटक्के,संदीप राउत आदी या वेळी उपस्थित होते या मांन्यवराचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन राजेश निवृत्तीराव लोणे (सरपंच)आणि प्रजापती राजेश लोणे यांनी सर्वांचा सत्कार केला.

या कार्यक्रमामधे
निवृत्तीराव लोणे यांच्या जीवान कार्यावर पुत्र राजेश लोने आणि सुदास लोणे यांच्या मार्गर्शनाखाली अंकुश लोणे आणि प्रसेंजित लोणे यांनी निर्माण केलेली चित्रफित पडद्यावर नागरिकांना दाखवली सर्व मांन्यवराच्या हस्ते गायक मंडळींना प्रमाण पत्र वाटप करण्यात आले नंतर ज्या लोक कलावंतांनी आपली कला सादर केली त्या गायक मंडळीना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला आणि ज्या ज्या रक्तदात्यानी रक्तदान केले त्या सर्व तरुणांना प्रमाणपत्र मान्यवरांचा हस्ते वाटप केले आहेत.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सरपंच राजेश लोणे सोबत सुदास लोणे,नागसेन लोने,प्रदीप लोणे,विजय लोणे भुजंग लोणे,भास्कर खिल्लारे ,सुभाष लोणे,वसंत गोवंदे ,रत्नपाल लोणे,कपिल लोने ,अमोल लोणे,आदी सर्व सहकारी मित्र मंडळी आणि गावातील नागरिकांनी सहकार्य केले संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम संचलन शाळेचे मुख्याध्यापक शामराव लोणे याणी केले तर सर्वांचे आभार अंकुश लोणे मांडले,या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्हाभरतील नागरिक उपस्थित होते..

34 Views
बातमी शेअर करा