*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.4.महाराष्ट्र शासनामार्फत अंगणवाडी मध्ये लहान बालकांना, गर्भवती महिलांना,पौष्टिक आहार मिळावा,त्यांची तब्येत सुधरावी, तब्येत चांगली रहावी,महिला प्रस्तुती काळात तंदुरुस्त असाव्यात आणि लहान मुलं हे सुदृढ बनावे,तंदुरुस्त रहावे , वजन वाढावं म्हणून 1) मुग डाळ पूडा 2) हरभरा पूडा 3) गहू पूडा 4) मिरची पावडर पाकीट 5) नमक पुडा 6) हलदीचे पाकीट अशी काही पदार्थ दिले जातात
शासन हे पदार्थ एकदम चांगले उत्कृष्ट दर्जेदार आहेत म्हणून जनतेला देतो. पण यामध्ये उलट प्रक्रिया होत आहे.
हे पदार्थ एकदम खराब क्वालिटीचे दिले जातात.या मालावर शासनाचा वेस्ट खर्च होत आहे.आणि कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही.
या मूग डाळी मध्ये काही एकदम बारीक व जळालेली मुग,आणि त्यामध्ये पांढरे वाळूचे खडे असतात. त्यामुळे हे चांगले निवडण्यासाठी महिलांना खूप वेळ व परिश्रम घ्यावा लागतो.त्यामुळे काही महिला थोडं प्रमाणात उपयोग करतात व काही महिला जनावरांना देतात व काही महिला कंटाळून फेकून देतात.
या पदार्थांमधील मिरची पावडर हे एकदम खराब दिलं जाते. मिरची पावडर चा कलर लाल असतो. तर या मिरची पावडर चा कलर काळसर असतो चव सुद्धा वेगळ्याच पद्धतीची गुळ-मुट लागते.ग्रामीण भागातील खूप जनता या दिल्या जाणाऱ्या माला विषयी खूप त्रस्त आहे. म्हणून शासनाने ह्या मालात सुधारणा करून,त्यात काही पदार्थांची वाढ करून,दर्जेदार व चांगल्या पद्धतीचा माल देण्यासाठी प्रयत्न करावा अशी जनतेतून मागणी होत आहे.