KINWATTODAYSNEWS

माहुर येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.2.जिल्यातील श्रीक्षेत्र माहूर येथे जालना जिल्ह्यातील अंतरावाली- सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी दि.1 सप्टेंबर 2023 रोजी लाठीहल्ला केला.त्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून माहूर बंदचे आव्हान करण्यात आले होते.त्याला अनुसरून शहरातील सर्वच *व्यापाऱ्यांनी* आपली दुकाने बंद ठेवली होती.शनिवारी सकाळीच मराठा समाजाच्या तरुणांनी अविनाश टनमने व जयकुमार अडकीने यांचे नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शिमगा खेळून जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, आणि टायर जाळला.सकल मराठा समाजाने उद्याला राज्यभर आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे,तर आजच माहूर बंद पाळण्याचा आतताईपणा का? असा पत्रकारांनी प्रश्न केला असता उद्याला केरोळी फाट्यावर काही वेळ रास्तारोको आंदोलन करण्यात येईल,मात्र बंद पाळण्यात येणार नाही,असे आयोजकांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले.

85 Views
बातमी शेअर करा