KINWATTODAYSNEWS

झाडाला राखी बांधुन एक धागा कृतज्ञतेचा हा विशेष उपक्रम

जालना/ येथील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था संचलित राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना च्या विद्यार्थीनींनी, पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या व सजीव जातीस, मोफत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या झाडांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. रक्षाबंधनानिमित्ताने देशभरात सामाजिक उपक्रम राबवून रक्षाबंधन सण साजरा होत आहे. ”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात जीवनातील वृक्षांचे महत्त्व वर्णन केले आहे. मानवास अखंडित व मोफत ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या झाडांना, शिक्षिका श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,श्रीमती.ए.बी.देशपांडे व विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली तसेच शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी शाळेचे वतिने विद्यार्थी,पालक व समाजाला कृतज्ञतेच्या भावनेतुन पर्यावरण पुरक राख्या भावला,शेतकऱ्यांना,सैनिकांना व वृक्षांना बांधण्याचे आवाहन…
केले.यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत.श्रीमती.एम.ए.खरात उपस्थिती होती.

राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयामार्फत असे विविध उपक्रम हाती घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती करूण पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येतो.विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या विद्यालयात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा दिवस साजरा केला. भविष्यात मानवाच्या रक्षणासाठी जीवसृष्टी वाचवण्याची गरज असल्याने व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वटवृक्ष लागवड करून व असण्याची झाडांची काळजी घेऊन त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. वृक्षांचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षांना राख्या बांधण्याचा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..!

207 Views
बातमी शेअर करा