नांदेड : दि.२८ ऑगस्ट रोजी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका येथे सीटू च्या नेतृत्वाखाली हजारो पूरग्रस्तांनी सकाळी साडेअकरा वाजता पासून सत्याग्रह सुरु केला होता.
नांदेड जिल्हा मजदूर युनियन चे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनास धारेवर धरले होते.
दि.२६-२७ जुलै रोजी नांदेड शहरासह जिल्हाभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते. एकशे पन्नास मिली मीटर पाऊस पडल्याची शासन दरबारी नोंद आहे.हातावर पोट असलेल्या कामगारांच्या संसाराचे एका दिवसात होत्याचे नव्हते झाले.
सीटू कामगार संघटनेने शहरातील काही भागात सर्वे करून तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. हजारो कामगार महापलिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.दि.३१ जुलै पासून अर्थसहाय्य मिळावे म्हणून महापालिका आयुक्त यांना रीतसर अर्ज करून मागणी करण्यात आली. अर्जाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालकमंत्री,जिल्हाधिकारी आदींना देण्यात आल्या.
वीस हजार रुपये रोख आणि पन्नास किलो अन्न धान्य देण्यात यावे मागणी करण्यात आली. नांदेड दक्षिण आणि उत्तर च्या आमदारानी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मदत जाहीर केली. तलाठी आणि बील कलेक्टरा मार्फत प्रत्यक्षात पाहणी करून अहवाल मागविण्यात आला. पाहणी करणाऱ्यांनी तोंड पाहून चिरीमिरी घेऊन नावे टाकल्याच्या अनेक तक्रारी संघटनेकडे आल्या.त्या दोषी बील कलेक्टर आणि तलाठी यांच्यावर हालगर्जी केल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५६ आणि ५७ नुसार निलंबणाची कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली.
महिना उलटला तरी शहरातील पूरग्रस्तांना अजून सानुग्रह अनुदान मिळाले नाही. ही शासनाने आणि प्रशासनाने केलेली पूरग्रस्तांची थट्टाच आहे म्हणत
दि.२८ ऑगस्ट रोज सोमवार पासून सीटू कामगार संघटनेने लेट झालेली आपत्कालीन मदत थेट द्या ! ही एकमेव मागणी घेऊन महापालिके समोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले होते.
ज्या ज्या पूरग्रस्त कामगारांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांना अजून शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. ते अर्जदार पोहच पावती सोबत घेऊन आंदोलनात सामील सामील झाले होते.
मंजूर झालेले सानुग्रह अनुदान आणि पन्नास किलो अन्न धान्य सरसगट जोपर्यत मिळणार नाही तो पर्यंत सीटू चा सत्याग्रह सुरु राहील असे सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियन चे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी घोषित केल्यामुळे सायंकाळी उशिरा आपत्ती विभागाची तातडीची बैठक आयुक्त महेश डोईफोडे आणि अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी घेतली आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शिष्ठमंडळा सोबत चर्चा केली आणि आमचा काही संबंध नाही असे दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॉ.गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त गिरीष कदमांच्या कक्षातून थेट जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांना फोन लावला जिल्हाधिकाऱ्यांचा फोन व्यस्त असल्यामुळे तात्काळ निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना फोन लावला आणि त्यांनी तात्काळ उचलून काय अडचण आहे म्हणून विचारणा केली. सत्याग्रह आणि सानुग्रह अनुदान संदर्भात माहिती त्यांना देताच त्यांनी एका मिनिटात प्रश्न मार्गी लावला असून जे हजर सत्याग्रही आहेत त्यांचे अचूक बँक पासबुक सादर करण्याचे सूचित केले आणि रात्री सात वाजता झालेल्या सर्व चर्चेची माहिती आंदोलकांना देऊन आज चा सत्याग्रह संपला असे कॉ.गायकवाड यांनी जाहीर केले. आधार कार्ड, युनियनची पोचपावती आणि अचूक बँक पासबुक घेऊन सर्व पूरग्रस्त पुढील दोन ते तीन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकन्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.लता गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड,शेख फारुख, प्रदीप सोनाळे,कॉ. सोनाजी कांबळे, कॉ. गंगाधर खुणे,अंजनाबाई गायकवाड, कॉ.मारोती आडणे,गोपीप्रसाद गायकवाड,ताराबाई पवार आदींनी केले.सुनिल अनंतवार आणि संतोष शिंदे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
महिना उलटला तरी सानुग्रह अनुदान मिळाले नाही ; हजारो पूरग्रस्तांचा सीटूच्या नेतृत्वाखाली महापालिके मध्ये सत्याग्रह
87 Views