किनवट/प्रतिनिधी:
दिनांक 29 जून रोजी गौरी तालुका किनवट येथील शेतकरी पांडुरंग हिरामन राठोड यांची बैल जोडी लाईटच्या खांबाला अडकून करंट लागल्याने दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला.
लाईटच्या खांब पाण्यात असल्याने त्या खांबाच्या खाली पाणी जमा झाले होते तिथून बैलजोडी जात असताना अचानक त्या खांबाला अडकल्यामुळे त्या खांबा मार्फत करंट उतरून जाग्यावर दोन बैल मृत्युमुखी पडले. आधीच कोरोना च्या या संकटाने होरपळलेल्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून सदरील शेतकऱ्यास शासना मार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी येथील गावकऱ्यांची मागणी समोर येत आहे.
सदरील समजताच पशुवैधीकीय अधीकारी , डाक्टर श्री शिवनकर , एम एस इ बी अधीकारी जाधव घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
तसेच शिवसेना उमरी सर्कल प्रमुख बजरंग शंकर वाडगुरे यांनी ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन घटनेची पाहणी केली व शेतकऱ्यांस नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.