नांदेड। भारत जोडो यात्रेचा इफेक्ट कर्नाटकच्या निवडणुकीत दिसून आला देशभरात काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. वातावरण मतात परिवर्तित व्हावे व पुन्हा देशात इंडिया आघाडी, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे यासाठी विद्यमान सरकारचे सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे असलेले दुर्लक्ष गावा-गावापर्यंत पोहोचवत जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठीच्या लोकसंवाद पदयात्रेचे सूक्ष्म नियोजन करीत यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र जोडो’ अभियान राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यात ‘लोकसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ११) शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल येथे काँग्रेस मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी भारत जोडोनंतर आता लोकसंवाद पदयात्रा यशस्वी करा : माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण…
114 Views