KINWATTODAYSNEWS

महापुरुषांचे विचार हे सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी महत्वाचे असतात तेंव्हा अधिकाधिक महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे -डॉ पंजाब शेरे

किनवट/प्रतिनिधी
महापुरुषांचे विचार हे सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी महत्वाचे असतात तेंव्हा अधिकाधिक महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन डॉ पंजाब शेरे यांनी सरस्वती महाविद्यालयात पार पडलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्य सम्राट.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद भंडारे हे होते.
सरस्वती कला महाविद्यालयात एक ऑगस्ट 2023 रोजी असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
प्रारंभी कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते हस्ते दोन्हीही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रोफेसर डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी केले.
आपल्या प्रभावी मांडणीतून डॉक्टर शेरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे श्रमिक जणांचे कैवारी होते, कामगार आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ करिता दीड दिवसाच्या शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून वाचा फोडण्याचे काम केले. त्यांच्या सर्व कलाकृती मधून विद्रोही नायक नायिकांचे चित्रण करण्यात आले आहे असे डॉ पंजाब शेरे यांनी सांगितले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांनी या राष्ट्रपुरुषांचे कार्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे? हे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा सतत विचार डोळ्यासमोर ठेवावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ सुनील व्यवहारे यांनी केले. सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले अखेर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ किरण आयनेनीवार यांनी केले.

97 Views
बातमी शेअर करा