KINWATTODAYSNEWS

“अमृत भारत स्टेशन योजने ” अंतर्गत विकसित होणाऱ्या देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या यादीत किनवट रेल्वे स्टेशनचा समावेश

किनवट (नांदेड) : हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी “अमृत भारत स्टेशन योजने ” अंतर्गत विकसित होणाऱ्या देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या यादीत किनवट रेल्वे स्टेशनचा समावेश केला आहे.
      प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) उद्घाटन होणाऱ्या “अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पुनर्विकासासाठी पायाभरणी समारंभा करिता तारीख: 6 ऑगस्ट 2023 वेळ: सकाळी 09:00 स्थळ: किनवट रेल्वे स्टेशन येथे उपस्थित राहण्यासाठी खासदार हेमंतभाऊ पाटील यांना निमंत्रित करण्यासाठी नांदेड येथील रेल्वे विभागीय कार्यालयाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री मनोजकुमार, मुख्य तिकीट निरीक्षक नांदेड श्री प्रमोद निकाळजे व श्री दिलीप देठे हे किनवट येथील खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांचेकडे निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली. यावेळी माजी नगरसेवक श्री व्यंकट भंडारवार,किरण तिरमनवार आदी उपस्थित होते.

124 Views
बातमी शेअर करा