किनवट प्रतिनिधी: दि 20 ते 27 जुलै या दरम्यान किनवट तालुक्यात दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीप पिकासाह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत तर घरांची पडझड होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत तालुक्यावर ओढवलेली नैसर्गिक आपत्ती व दोन वेळेची अतिवृष्टी लक्षात घेऊन किनवट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रु ची तातडीची आर्थिक मदत देऊन कर्जमाफीचा लाभ द्यावा अशा मागणीचे निवेदन किनवट तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारा मार्फत 26 जुलै रोजी देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले की दि 20 ते 27 जुलै या सात दिवसाच्या कालावधीतच किनवट तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात दोन वेळा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे खरीप पिकासह शेतजमिनी पूर्णतः खरडून गेल्या आहेत. सततच्या अतिमुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोर गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. सावकारी उसणवारी कर्ज घेऊन खरीपाची पेरणी केलेले शेतकरी दोनदा झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा कर्जबाजारी होऊन संकटात सापडले आहेत.दुबार पेरणी आता शक्य नसून खरडलेल्या शेतजमिनीचे नुकसान कसे भरून काढावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अल्पशा कालावधीत झालेला अतिपाऊस व शेतीक्षेत्राचे नुकसान लक्षात घेऊन शासनाने किनवट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुची सरसकट तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच थकबाकीदार व नियमित पीककर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व बँकाचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे.अशा मागण्या किनवट तालुका युवक काँग्रेसने निवेदनात केल्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व कृषिमंत्र्यांना देखील पाठविल्या आहेत. निवेदनावर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईशरथ हसन शेख,काँग्रेसचे जिल्हा सचिव युवा नेते सुभाषबाबू नायक राठोड, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष अडकीने पाटील, विद्यार्थी नेते विकास कुडमते,शेख सर्फराज शेख शरीफ,सुरेश गोफने,शेख जावेद चिखलीकर,शेख अफरोज,शेख नवाज शेख रजाक,शेख समीर शेख मुसा,शेख आरिफ शेख शौखत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रु ची तातडीची आर्थिक मदत देऊन कर्जमाफीचा लाभ द्या. मागणीचे निवेदन किनवट तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारा मार्फत सादर
508 Views