KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, महिलांचा सन्मान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रोहा, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य रोहा तालुका कार्यकारिणीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण विभाग अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिला अध्यक्षा दिपिकाताई चिपळूणकर, रोहा तालुका अध्यक्ष सचिन मोरे, आगरी समाजाचे रोहा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, उपसरपंच सुनिता डाके, ग्रामविकास अधिकारी प्रमोद तरे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे, राकेश मोरे, सुनिता मोरे मुख्याध्यापिका सानप आदी मान्यवर उपस्थित होते. पदाधिकारी, शिक्षक, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांना चादर व महिलांना छत्री वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात करित असलेल्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आईबाबा, शिक्षक व गावाचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. कोकण विभाग अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी संघटना शुन्यातून महाराष्ट्रभर पोहचून विद्यार्थी, पत्रकार व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कशी कार्य करते याचा उलगडा केला. तर कोकण विभाग महिला अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर यांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सन्मान होतोय हा दुग्धशर्करा योग असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे रोहा तालुका अध्यक्ष सचिन मोरे, निवेदन हरिश्चंद्र मोरे यांनी केले तर आभार शिक्षक दिपक कदम यांनी मानले. यावेळी संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

120 Views
बातमी शेअर करा