नांदेड/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याच्या दै.विष्णुपुरी एक्सप्रेसचा वर्धापनदिन अनेक मान्यवरांच्या उपस्थीतीत संपन्न झाला असुन यात विविध सामाजीक उपक्रम घेण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत असे कि दि. 26 जुन 2023 रोजी प्रसिध्द ग्रिनफिल्ड नॅशनल स्कुल येथे उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन सौ.दिपालीताई शिवराज पाटील होटाळकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन कु. पुजाताई मारोतराव पाटील कवळे, अनुराधाताई कुलकर्णी, धर्माबाद येथील आरके एसव्हिएम च्या एमडी सौ.राजकुमारी सुबोधजी काकाणी, यवतमाळ येथील उज्वला मानकर, सौ. निर्मला मनोज बुंदेले, कु. धनश्री बुंदेले तसेच विशेष अतिथी म्हणुन शिवराज पाटील होटाळकर, इजिं.हरजिंदर सिंघ संधू जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ नांदेड, परभणीचे डॉ.प्रकाश जी कुरे व डॉ. सोलापुरे उपस्थीत होते.
सदरिल वर्धापनाचे कार्यक्रम महिलांना समर्पित करण्यात आले होते या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण तसेच महिलांचे राजकारणात व समाजकारणातील महत्व या विषयावर व्यख्यान करण्यात आले. यावेळी सौ. अनुराधा कुलकर्णी, पुजाताई कवळे, आरती चौहाण, उज्वला मानकर यांची या विषयावर महत्वपुर्ण व सविस्तर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रामाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणा-या 15 महिलाचा सन्मान वर्णी गंगन्ना लोककल्याण पुरस्कार, राजाराम काकाणी शिक्षण पुरस्कार, घिसुसेठ कालिया खेलरत्न पुरस्कार, भिकुलाल बुंदेले लोककल्याण पुरस्कार, जयवंतराव रत्नाळीकर लोककल्याण पुरस्कार ईत्यादी पुरस्कार महिलांना देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हाच्या “उज्वला मानकर” यांच्या उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले
तसेच दहवीत विशेष प्राविण्यासह उतिर्ण झालेल्या उपस्थीत 50 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तदनंतर दैनिक विष्णुपुरी एक्सप्रेसच्या वर्धापनाच्या अंकाचे प्रकाशन करुन कार्यक्रमाची संगता करण्यात आली.
या कार्यक्रमास नागरिक,महिला व मुलांनी गर्दी केली होती. यावेळी डॉ. बालाजी श्रीगिरे, मुख्याध्यापक गंगाधर चिवटे, आनंत कुदाळे, गणेश गिरी, पत्रकार गणेश पा.राजापुरकर, गंगाधर धडेकर, लक्ष्मण पा. येताळे, संपादक शिवराज पा. गाडिवान, पोतन्ना लखमावाड, बाबु पाटील आलुरकर, गंगाधर अलुरोड, जे.के. जोंधळे, पांडु पाचाळ, श्यामराव बासरकर,लक्ष्मण निदानकर,आनंद, चव्हाण, राम चौहाण,काशीनाथ उषलवार, रमेश बुंदेले आदी असंख्य जनसमुदाय उपस्थीत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरिधर बुंदेले, अहमद लड्डा, प्राचार्य शेख कदीर, हिंगणे, जाधव, बबेश माहुरकर, विजय परदेसी ओमकार बुंदेले, विक्रम तुकडेकर, यकिन तानुरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन राजेश मनुरे यांनी केले तर उपस्थीतांचे आभार दै.विष्णुपुरी एक्सप्रेसचे मुख्यसंपादक मनोज बुंदेले यांनी मानले