KINWATTODAYSNEWS

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी (सामाजिक न्याय दिन) पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मातंग समाजाचे धरणे आंदोलन संपन्न

पुणे/प्रतिनिधी:छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी (सामाजिक न्याय दिन) पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते,
सकल मातंग समाजाच्या (पुणे शहर जिल्हा) वतीने आरक्षणाच्या पर्याप्त लाभा पासून अनुसूचित जातींमधील वंचित उपेक्षित जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
1. अनुसूचित जाती आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे
2. बार्टी या संस्थेचा मातंग व इतर वंचित जातींना लाभ मिळत नसल्याने मातंग व इतर वंचित जातीं साठी आर्टी ( साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) ची स्थापना करावी.
3. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शासनाने तत्वतः मान्य केलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी संबंधित सर्व विभागाने आर्थिक तरतूद करुन GR काढण्यात यावा.
४. मातंग समाजावर वाढत चाललेले अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करावी.

या चार प्रमुख मागण्यांसाठी आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी (सामाजिक न्याय दिन) पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते,
अनु.जाती मध्ये 59 जाती असून आरक्षण आणि विविध योजनांचा लाभ 59 जाती पैकी सक्षम असलेल्या केवळ तीन जातींनाच मिळत आहेत. त्यामुळे मातंग जातीसह इतर 56 जाती या आरक्षणाच्या लाभापासून दूर फेकल्या जात असल्याने या जाती अधिक अधिक कमजोर होत आहेत, तर फक्त तीन जाती अधिकाधिक सशक्त होत आहेत. त्यामुळे अनु.जाती मध्ये प्रचंड विषमता निर्माण झाली आहे. या सर्व वंचित जातींना सामाजिक न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून मातंग समाज आरक्षणाचा आणि विविध योजनांचा पर्याप्त लाभ मिळावा यासाठी आक्रोश करीत आहे. मातंग समाज आपल्या न्याय हक्काच्या उपरोक्त मागण्यासाठी अतिशय संवेदनशील झाला असून या मागण्या लवकर मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात येतील असे निवेदन मा.जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन गोवर्धन उर्फ बापू खुडे यांनी केले. याप्रसंगी नगरसेविका स्वातीताई लोखंडे, विष्णूभाऊ कसबे, शंकरभाऊ तडाखे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, अण्णा कसबे, उषाताई नेटके, राजाभाऊ धडे, अशोकभाऊ लोखंडे, भास्कर नेटके, शिवाजीराजे राजगुरु, काशिनाथ आल्हाट, नामदेव,घोरपडे, सचिनभाऊ इंगळे, निलेश वाघमारे, संजय केंदळे, संतोष माने, अमोल खंडाळे, सचिन जोगदंड, लक्ष्मण तांदळे, संतोष पवार, संतोष देवकुळे, शाम चंदनशिवे, विनोद अष्टुळ, विजय साठे, महेश सकट, राजू दोडके, भारत रणदिवे आदि प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

379 Views
बातमी शेअर करा