*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.17. जिल्यातील दक्षिण मध्य रेल्वे मधील सिकंदराबाद झोन अंतर्गत बासर ते मुदखेड दरम्यान विद्युतीकरणांचे काम जवळपास पूर्ण झाले असून ३०जून रोजी पूर्ण झालेल्या विद्युतलाईन मध्ये विद्युत पुरवठा सोडण्यात येणार असून सदरील रेल्वे लाईन वरील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या विद्युतीकरण विभागातर्फे करण्यात आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद झोनमध्ये विद्युतीकरण करण्याचे काम निजामबाद पर्यंतच झाले होते.निजामबाद पासून बासर व बासर पासून मुदखेड हे काम गेल्या सहा महिन्यापासून प्रगतीपथावर होते ते जवळपास पूर्ण झालेले आहे.
त्यामुळे सदरील रेल्वे लाईन मध्ये रेल्वे विद्युतीकरण विभागातर्फे विद्युत पुरवठा सोडण्याचा प्रयोग ३० जून रोज शुक्रवारी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने भारतीय रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद झोन अंतर्गत रेल्वे विद्युतीकरण विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम चालू आहे. रेल्वे विद्युतीकरण विभागातर्फे सर्व नागरिकांना आव्हान करताना सदरील लाईन मध्ये २५०००होल्ट्स ५० एच.झेड. एसी ओवरहेड ट्रॅक्शन वायरमध्ये बासर ते मुदखेड दरम्यान विद्युत पुरवठा सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.२५ के.व्ही.ट्रॅक्शन काय असते हे समजून सांगत त्याबाबत संभाव्य धोके काय असतात याबद्दलही रेल्वे लाईन वरील सर्व नागरिकांना जनजागृती करणे चालू आहे.
यामध्ये उंच गेट धोकादायक असून त्यामुळे रोड व रेल्वे लाईन मध्ये सतत अडथळा निर्माण होऊ शकतो,उंच असणाऱ्या जड वाहनातून वाहतूक केल्या जाणाऱ्या क्रॉसिंगच्या रोडवर मालास व वाहनास धोका होऊ शकतो, विद्युत कंडक्टरच्या जवळ आल्यास आग लागून जीवित व वित्तहानी होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सावध राहून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य प्रकल्प संचालक रेल्वे विद्युतीकरण विभाग दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद तर्फे करण्यात आली आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर आता धर्माबाद स्थानकावरून विद्युतवर चालणाऱ्या आद्ययावत रेल्वे गाड्या लवकरच धावणार असल्याचे संकेत जरी मिळत असले तरी बऱ्याच रेल्वे गाड्या गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करत असूनही धर्माबाद रेल्वे स्थानकावर थांबा मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनावर धर्माबादकरांची नाराजी अद्यापही कायमच असून आमदार, खासदार यांनी यासंदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी धर्माबाद तालुकावासिंयातून होत आहे.