KINWATTODAYSNEWS

वनक्षेत्र अंबाडी परिमंडळ अंबाडी- पिंपळगाव,कक्ष क्रमांक 144 मध्ये इमारती नग 2.034 घनमीटर सह मुद्देमाल जप्त

किनवट/प्रतिनिधी: दिनांक 12 /6 /2023 रोजी वन विकास महामंडळ अंतर्गत वनक्षेत्र अंबाडी परिमंडळ अंबाडी- पिंपळगाव ,कक्ष क्रमांक 144 मध्ये वनपाल व संरक्षक वनक्षेत्रात नियमित गस्त करत असताना साग व इतर प्रजातीचे वृक्षतोड केलेले दिसून आले. तसेच काही अज्ञात संशयित अंबाडी ते जवरला रस्त्यावर दुचाकी ने फिरत असताना दिसून आले त्यानुसार विभागीय व्यवस्थापक यांचे मार्गदर्शनाखाली श्री एस एल राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी अंबाडी यांच्या नेतृत्वात साकार असून वनक्षेत्रात सापळा रचून दबा धरून बसलेले असताना रात्री सुमारास 23.00 वाजता छोटा टेम्पो घटनास्थळी जात असल्याचे अध्यक्ष आले व साग इमारती माल गाडीत भरताना आवाज आला तेथे सर्व वन अधिकारी व कर्मचारी गाडीच्या दिशेने जात असताना आरोपींना चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
घटनास्थळी गाडीमध्ये व इतर ठिकाणी इमारती नग 2.034 घनमीटर किंमत 42033/- टाटा आयचर वाहन क्रमांक ए पी 15 टी बी 0454 किंमत100000/- तलवार1 नग झाडे कापण्याची आरी लोखंडी पट्टी चार नग जप्त करण्यात आले.
सदर घडलेले गुन्ह्याबद्दल भारतीय अधिनियम 1927 कलम 26(1) इ फ ड कलम 41 42 52 66 69 दिनांक 12/ 6/ 2023 नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास चालू आहे .
या कारवाही श्री एस सी एल राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी अंबाडी यांच्या नेतृत्वाखाली श्री व्ही के.राठोड,के आर मोरे,नितेश बारसाखळे, सर्व वनपाल व एम एम शेख, श्री एन के सुंदरडे, कुमारी एन के सिसले, श्री बी एन निगसेट्टी ,श्री एम लाडेकर व सर्व वनरक्षक श्री अप्पाराव पवार, अमोल शीर्षे वाहन चालक ,श्री एस पाटील वनमजूर या सर्वांनी मिळून कारवाही केली.

133 Views
बातमी शेअर करा