पुणे: सकल मातंग समाज पुणे आयोजीत वंचित जाती आरक्षण परिषद आज पुणे येथे संपन्न झाली.
या परिषदे मध्ये सकल मातंग समाजाचे नेते,मा विष्णु भाऊ कसबे (लहुजी शक्ती सेना अध्यक्ष) प्रा.मचिंद्र सकटे साहेब (दलित महासंघ अध्यक्ष) मा.गणपत भिसे सर (लाल सेना अध्यक्ष) मा.संजय गायकवाड सर (लसाकमा अध्यक्ष) मा.मारूती वाडेकर साहेब,मा.सुदाम धुपे साहेब,पुणे उप महापौर सरस्वती ताई शेंडगे.अँड राम चव्हाण,लहुजी क्रांती सेना अध्यक्ष सुरेश पाटोळे,मा.पंडीत कांबळे सर (राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग उप अध्यक्ष ,तसेच मा सुभाष जगताप सर मा.नगर सेवक,पुणे,तसेच पुणे येथील विविध संघटना प्रमुख आणि उपस्थित मान्यवर महीला भगिनी आणि समाज बांधव उपस्थित होते.
मातंग समाजाचे प्रसिद्ध उद्योजक मा.अनिलदादा सौंदड यांना जेजुरी संस्थानक मध्ये घेतले त्या बद्दल आणि सौ.जोशीलाताई लोमटे (सकल मातंग समाज महाराष्ट्र समन्वयक)”यांना पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र शासनानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे उप महापौर सरस्वतीताई शेंडगे आणि समाजाचे नेते ,शंकरभाऊ तडाखे,मा.विष्णु भाऊ साहेब कसबे यांनी सत्कार केला..
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे भाऊ आणि मातंग समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र समन्वयक भास्कर दादा नेटके ,साळवे साहेब यांनी खुप परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
सकल मातंग समाज पुणे आयोजीत वंचित जाती आरक्षण परिषद आज पुणे येथे संपन्न .
236 Views