KINWATTODAYSNEWS

“ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया ; रिॲलिटी एँड ऍप्रोच” हे पुस्तक अदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक  -खासदार हेमंत पाटील

किनवट : आदिवासी भागातून जाऊन शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात झेंडा रोबला. तोही इंग्रजीत. प्रो.डॉ. विजयालक्ष्मी गोणेवार यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेलं ” ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया ; रिॲलिटी एँड ऍप्रोच ” हे पुस्तक अदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक आहे. असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केले.
      येथील भूमिपुत्री तथा इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. विजयालक्ष्मी गोणेवार लिखित “ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया ; रिॲलिटी एँड ऍप्रोच”ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे बोलत होते. यावेळी आमदार भीमराव केराम, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. घनश्याम येळणे, माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, व्यंकटराव नेम्माणीवार, आंध्रप्रदेश आदिवासी विकास विभाग हॉर्टिकलचे माजी सहाय्यक संचालक एम. नारायणराव, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, सुधाकर भोयर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, मराठवाडा जनता विकास परिषद नांदेडचेअध्यक्ष गंगन्नाजी नेम्माणीवार हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन
किनवट : पुस्तक प्रकाशन प्रसंगी डावीकडून बोलतांना खा.हेमंत पाटील लेखिका डॉ. विजायलक्ष्मी विलास राव, नारायणराव सिडाम, गंगन्ना नेम्माणीवार, व्यंकटराव नेम्माणीवार, हाजी इसाखान, प्रो. डॉ. घनश्याम येळणे, आ. भीमराव केराम , प्राचार्या शुभांगी ठमके , एम. नारायणराव , इन्सॅट मध्ये डॉ. विजायलक्ष्मी विलास राव यांचा सत्कार करतांना खा. पाटील (छाया : निवेदक कानिंदे)

       पुढे बोलतांना खा. पाटील म्हणाले, हजारो सरकारी योजना येतात जातात, परंतु माणसं उभं राहात नाहीत. हे या देशाचं खऱ्या अर्थानं शल्य आहे. हजारो कोटी रुपये शासन देतं, तेच रस्ते, त्याच नाल्या, त्याच पिण्याच्या पाण्यावर आपण सातत्यानं बोलत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत. ट्रायबल भागातल्या ट्रायबल योजना जणूकाही अधिकाऱ्यांना कुरण आहेत की काय अशाच प्रकारे त्या योजनांचं इम्प्लिमिटेशन होतं. पण दुर्दैवानं अदिवासी माणूस जिथल्या तिथेच राहतो. उद्योगमंत्र्यांनी येथील एमआयडीसीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत. विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी किनवटच्या बंधाऱ्यासह 7 बंधारे मंजूर करून घेतलेत. त्यामुळे किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव व उमरखेड तालुक्यातील 75 हजार हेक्टर जमीन भिजणार आहे. माहूर लिफ्टचं नुकतच भूमिपुजन झालय. शक्तीपीठमार्ग माहूर- औंढा-नागनाथ-तुळजापूर-गोवा लवकरच होणार आहे. आता हिमायतनगर-किनवट रस्त्याच्या कामाला गडकरी साहेबांनी टर्मिनेट केलय. किनवट जिल्हा झाला पाहिजे ही जुनी मागणी आहे. आमदार व आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे यासाठी आग्रह धरणार आहोत. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे लेखिकेने या पुस्तकात या भागाच्या समस्या- प्रश्न मांडलेत.
     मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. रोपटे व महावस्त्र देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी हैदराबाद येथील एम्सचे असिस्टंट प्रोफेसर डाॅ.गोविंदराव कुसनेणीवार व रांगोळीकार महेंद्र मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. विलास गोणेवार यांनी आभार मानले. या ग्रंथाच्या लेखिका डॉ. विजयालक्ष्मी गोणेवार यांनी लेखना मागची भूमिका विशद केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
    याप्रसंगी आमदार भीमराव केराम आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले, पी. एच.डी. अभ्यासानिमित्त विजयालक्ष्मी आदिवासी बहुल 180 पाड्यात गेल्या. त्यांचे पती विलासराव आदिवासी खेड्यातलेच असल्याने त्यांना गोंडी भाषा चांगली बोलता येते. त्यातून ह्या दाम्पत्याने आदिवासी समस्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना पाहिल्या. खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठीच्या सूचनाही त्यांनी संशोधन ग्रंथातून मांडल्या. आदिवासींच्या विकासासाठी शिक्षण अत्यंत गरजेचं म्हणून समाजशास्त्रज्ज्ञ आल्मंड ड्रॉप यांनी निजामकाळात
अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षण सुरु केलं. तेथे शिक्षित शिक्षकांनी आपल्या भागात सेवा दिली. अशाच पद्धतीने हा ग्रंथ दिशादर्शक आहे.
     यावेळी शक्ती गोणेवार, अजय नेम्माणीवार यांचेसह मंचावरील सर्वच अतिथींनी विचार मांडले. कार्यक्रमास जिपचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,  माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, सुनिल पाटील, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, राम पाटील, संशोधक लेखक नारायणराव डवरे, योगतज्ज्ञ अखिलखान, सेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, सुरज सातुरवार, मारोती दिवसे पाटील, कपिल अण्णा रेड्डी, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, बाबूराव केंद्रे, अनिल तिरमनवार , बिभीषण पाळवदे, सुनिल नेम्माणीवार, प्रा. राजकुमार नेम्माणीवार, खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदी मान्यवरांसह पत्रकार, बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते, श्रोते उपस्थित होते.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय नेम्माणीवार, श्रिनिवास नेम्माणीवार, संतोष तिरमनवार, मनोज तिरमनवार, गौरव नेम्माणीवार, अभय नेम्माणीवार, डाॅ. अर्चना कुसनेनीवार, अभिलाषा नेम्माणीवार, सुहासिनी नेम्माणीवार, प्रा. ममता नेम्माणीवार, वंदना तिरमनवार, नंदा तिरमनवार, सायली नेम्माणीवार, मोनिका नेम्माणीवार, शिवा, शक्ती, ऋषी, विराज, मोक्ष, गुंजन, श्लोक आदींनी परिश्रम घेतले.

147 Views
बातमी शेअर करा