*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.तेलंगाना राज्याची राजधानी हैद्राबाद येथे लिंगायत समन्वय समिती च्या वतीने 4 जून रोजी 2023 रोजी लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व या समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चात जास्तीत जास्त लिंगायत समाजाला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने धर्माबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत उपस्थित मान्यवर
तेलंगणा राज्य अध्यक्ष श्री.ईश्वर आप्पा तथा श्री.शिवआप्पा भाजपा नेते तेलंगणा व वीरशैव लिंगायत तेलंगणा कोषाध्यक्ष अँड श्री.दिनेश पाटील व राष्ट्रीय बसव दल तेलंगणा राज्य उपाध्यक्ष तेलंगणा राज्य श्री.यशवंत पाटील जहीराबाद तथा लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वय तथा बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अँड.अविनाश भाऊ भोसीकर तथा धर्माबाद तालुक्यातील सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती.या महामोर्चाचे नेतृत्व तेलंगानातील खासदार बी.बी.पाटील हे करणार असून महामोर्चा नियोजनासंबधी धर्माबाद येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या महामोर्चात धर्माबाद तालुक्यातील लिंगायत बांधवांनी 4 जून रोजी हैद्राबाद येथे लिंगायत महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणार असे समाजबांधवांनी सांगितले.तथा नांदेड जिल्हातुन जास्तीत जास्त संख्येने जेष्ठ मंडळी व विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवर तथा युवक वर्ग लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव सहभागी होणार असे महामोर्चाच्या पुर्वतयारीसाठी बैठकीमध्ये धर्माबाद तालुक्यातील लिंगायत बांधव सांगितले.
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय हो
आम्ही लिंगायत आमचा धर्म लिंगायत हे ब्रीद घेऊन एक लिंगायत लाख लिंगायत नारा देऊन 4 जून रोजी हैद्राबाद येथे लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे.