उदगीर/जि.लातुर : महाराष्ट्रातील सकल मातंग समाजातील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची नियोजन बैठक उदगीर येथे दि.२८/०५/२०२३रोज रविवार लिंकन इंटरनॅशनल स्कूल निडबेन, उदगीर ता.उदगीर जि लातूर येथे संपन्न होत आहे.
उद्याच्या उदगीर येथील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण राज्यस्तरीय बैठकीसाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी येथील नियोजन मंडळींनी तयारी केली आहे.
ही बैठक मातंग समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण होण्यासाठी महत्वाची नांदी ठरणार आहे. या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या (अ,ब,क,ड) आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी मातंग समाजातील माजी मंत्री,आजी माजी खासदार, आमदार, शिक्षक, प्राध्यापक, डाॅक्टर, इंजिनिअर,वकील,उद्योजक, व्यापारी,कलावंत, सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, संस्थाचालक,लेखक, विचारवंत, शेतकरी,कामगार,यांना नम्र विनंती केली आहे की,सकल मातंग समाज आयोजित अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण राज्यस्तरीय नियोजन बैठकीला सर्वांनी उपस्थित रहाणे हे आपले आद्यकर्तव्य आणि जबाबदारी असणार आहे.
दि.२२ फेब्रुवारी २०२३ वार बुधवार रोजी झालेले ‘जवाब दो आंदोलन’ आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने यशस्वी झालेले आहे याची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आलेली आहे हे सर्व आपल्या संघटीतपणाचा परिणाम आहे. याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी एका विचाराने एका ठिकाणी आपल्या समाजाच्या हितासाठी विचारविनिमय करणे महत्वाचे आहे, सर्व जाणत्या समाजबांधवांना नम्र आवाहन व विनंती करण्यात आली आहे की, उदगीर येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीला उपस्थित राहावे.
*स्थळ :-लिंकन इंटरनॅशनल स्कूल निडबेन उदगीर ता.उदगीर जि.लातूर*
*वेळ:- सकाळी ठीक १०.००वाजता*
*आपले विश्वासू*
*सकल मातंग समाज, उदगीर*
उद्या उदगीर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सकल मातंग समाजातील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन
502 Views