KINWATTODAYSNEWS

भाजपाच्या वतीने किनवट शहरात चक्काजाम आंदोलन

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) ओबीसीचे आरक्षण पुन्हा स्थापित व्हावे या मागणीसाठी किनवट शहरात भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने जिजामाता चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यावेळी आमदार भीमराव केराम व तालुक्यातील भाजपाचे सर्व नेते उपस्थित होते.

भाजपा ओबीसी व सर्व मोर्चाच्या वतीने हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन शांततेत व कोरोना नियमाचे पालन करून करण्यात आले. राज्य शासनाच्या धोरणाविरोधात आवाहन करत आमदार भीमराव केराम म्हणाले की 52% ओबीसींवर अन्याय झाला नाही पाहिजे, आरक्षण होते ते स्थापित व्हावे अन्यथा सर्व ओबीसी बांधव सरकारच्या धोरणा विरोधात रस्त्यावर उतरतील. शेतकरी, शेतमजूर आज महाराष्ट्रात हवालदिल झाला आहे. कर्जमाफी सारखे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते निकाली काढण्याचे सरकारला आवाहन आहे. आता ओबीसी बांधव शांत बसणार नाहीत असे केराम म्हणाले.यावेळी ओबीसी आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष बाबूराव केंद्रे यांचेही भाषण झाले. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष रागु मामा, अँड रमन जायभाये, दिनकर चाडावार, आनंद मच्चेवार, बिबीशन पाळवदे सर, आत्माराम मुंडे, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, नामदेव केंद्रे, विवेक केंद्रे, अजय चाडावार, राम मुंडे, दत्ता आडे, डॉक्टर नामदेव कराड,सुरेश रंगनेनिवार, श्रीनिवास नेमानीवार, अनिल पवार, गंगुबाई परेकर, सागर शिंदे,शैलेश गटलेवार, सतीश एंड्रलवार,शैलेश गटलेवार, सुरेखा घाटकर,नरेंद्र श्रीमनवार, बालाजी धोत्रे, शिवा क्यातमवार, मधु आनेलवार,उमाकांत कराळे, जयराम कंचरलावार,सतिश बिराजदार,शेखर चिंचोळकर, बंटी आनेनिवार,सहित शेकडो भाजपा कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.

162 Views
बातमी शेअर करा