KINWATTODAYSNEWS

तेलंगणा राज्य आदिलाबाद जिल्ह्यातील ताडेहातनूर येथे साकरतेय भव्य मातंग ऋषी संस्कार केंद्र.मदतीचा ओघ वाढला.

आदीलाबाद(तेलंगणा) : तेलंगणा राज्य आदीलाबाद जिल्ह्यातील ताडेहातनूर येथे मातंग ऋषी संस्कार केंद्र चे बांधकाम मध्यप्रदेशातील हम्पी येथील मातंग ऋषी च्या मंदिरातील माती व पवित्र जल दि. 05-02-2023 ला ताडीहातनूर येथे आणून मातंग ऋषी संस्कार केंद्राचे व मंदिराचे काम चालू केले आहे. या कामाचे फाउंडेशन व पिल्लर चे काम पूर्ण झाले आहे.
या कार्यासाठी माधवराव गायकवाड मध्यप्रदेश, चंद्रकांत कर्नाटक, निलेश कांबळे गुजरात, शिवाजी महाराज हिंगोली, बालाजी गायकवाड मराठवाडा, लखन कांबळे विदर्भ,यांचे सहकार्य लाभले.
देशात प्रथमच मातंग ऋषी संस्कार केंद्र व मंदिर बनत असून असा प्रयोग इतरही राज्यातील व जिल्ह्यातील लोकांनी केला पाहिजे असे मातंग ऋषी संस्कार केंद्राचे संस्थापक पंढरी सूर्यवंशी, आधक्ष पांडुरंग सागरी,सदाशिव घाटे, रामराव घाटे, नरसिंग मोरे, वामनराव वाघमारे, अरविंद कलवले व आनीरुध केंद्रे यांनी सांगितले.
ताडेहातनूर येथे बनत असलेल्या संस्कार केंद्र व मंदिरास आदिलाबाद जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या निर्माण होणाऱ्या भव्य मातंग ऋषी संस्कार केंद्रास आर्थिक सहकार्य करण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

136 Views
बातमी शेअर करा