*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.भारत राष्ट्र समिती या पक्षाची राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षण शिबिरामध्य भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचं मार्गदर्शन लाभले.के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून आलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या शाखा व कोर कमिट बनवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.आपल्या भाषणात के सी.आर.म्हणाले की,महाराष्ट्रात ५० हजार खेडी आहेत.
त्यामुळे पन्नास हजार शाखा आपल्याला बनवण्याची शपथ तुम्ही घ्यावे.महाराष्ट्राने आत देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आलेली आहे. भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांनी देशाचे नेतृत्व करावे.तेलंगणा व महाराष्ट्राची सीमा ही १००० किलोमीटर बॉर्डरची आहे.आणि त्याचबरोबर मध्य प्रदेश,गुजरात, छत्तीसगढ मध्ये सुद्धा भारत राष्ट्र समिती काम करणार आहे. भारतात परिवर्तनाची लाट आणण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते काम करणार आहेत.
३० दिवस हे अभियान महाराष्ट्रत आपण चालवणार आहोत. दिनांक २२ मे २०२३ ते २२ जून २०२३ पर्यंत हे अभियान महाराष्ट्रत चालणार आहे.रोज गाच गावात जाऊन दहा कमिटी प्रत्येक बीआरएस कार्यकर्त्यांना व विधानसभेच्या रामचयकांना बायचे आहेत.
त्यामध्ये भारत राष्ट्र रामिती पक्षाचे मुख्य रामिती, भारत राष्ट्र किसान समिती,भारत राष्ट्रीय युवा समिती,भारत राष्ट्र महिला समिती,भारत राष्ट्र ओबीसी समिती,भारत राष्ट्र एससी समिती,भारत राष्ट्र एसटी समिती,भारत राष्ट्र अल्पसंख्याक समिती,भारत राष्ट्र विद्यार्थी समिती,भारत राष्ट्र कामगार समिती च्या शाखा सर्व गावात उघडण्यात उघडाव्यात असे आदेश केसीआर यांनी त्यांच्या भाषणात दिलेले आहेत.ज्या ज्या गावात आपण जाऊन पक्ष वाढीचे काम करणार आहेत.
त्या गावातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या व दलित,मुस्लिम आदिवासी कार्यकर्त्यांच्या घरी साधे जेवण करून आपण हे काम करा असे आदेश त्यांनी दिले. प्रत्येक गावात जाग्यासाठी पाच जणांची कोर कमिटी त्यांनी केलेली आहे व ही लोकं प्रत्येक गावात जाऊन गाव भेट देऊन पक्ष वाढीचे काम करणार आहेत. जवळपास पहिल्या उप्प्यात एक कोटी सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे काम या माध्यमातून करणार आहेत.एक कोटी जनतेपर्यंत पहिल्या टप्प्यात भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत.
गंधरा लाख किलोमीटरचा प्पा गाठण्यासाठी २८८ वाहने महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार असल्याचे केसीआर साहेबांनी सांगितले.कुठलीही समस्या आली तरी अभियान थांबवता कामा नये.महाराष्ट्रातील सेवानिवृत कर्मचान्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश करून देश हिताचे काम मध्ये पुढाकार घ्यावा असे आव्हान केसीआर साहेबांनी केले तसेच ऑनलाइन अपडेट सुद्धा करण्यासाठी व दरोज किती गावात जाऊन प्रचार प्रसार केला व किती कार्यकर्ते जोडले व किती सामान्य नागरिक पक्षात आले. यासाठी सॅमसंग कंपनीचे टॅब पक्षाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देण्यात आले.त्याचबरोबर पक्षाचे साहित्य सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे.
त्यामध्ये पक्षाची शांल,इंडि,टोपी,पोस्टर,पुस्तक, पोम्प्लेट, स्टिकर आणि गावात लावण्याची तोरण व पेन ड्राईव्ह सुद्धा वाटप करण्यात आले दोन दिवस है अभियान चालू राहणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभियानात जास्तीत जास्त जनतेने यावे यासाठी सुद्धा आव्हान केसीआर साहेबांनी केले.भारत देश हा बुद्धिजीवीचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतीचे प्रतीक आहेत. त्यांना आदर्श ठेवून पक्ष वाढीचे काम महाराष्ट्रात केले पाहिजे असे आदेश सुद्धा केसीआर साहेबांनी दिले.
भारत देशा मध्ये परिवर्तन आणण्यासाठी जीवाचे रान करा व शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या हितासाठी व महाराष्ट्रात जलसिंचन प्रकल्प आणण्यासाठी संघर्षमय जीवन जगण्यासाठी भारत राष्ट्र समिती या पक्षात सामील होण्याचे आव्हान त्यांनी त्यांच्या भाषणात केले.केसीआर साहेब पुढे म्हणाले की,माझा पक्ष हा आजीवन मी नतल्यावर सुद्धा टिकण्यासाठी मी पुणे,मुंबई, औरंगाबाद,नागपूर येथे विभागीय कार्यालय पक्षाच्या निधीमधून विकत घेणार आहे व त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यवर्ती जिल्हास्तरीय कार्यालय सुद्धा आपण सुरू करणार आहोत.महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पठार रागा आहेत आणि कृष्णा आणि गेदावरी प्रमुख नदी व त्यांच्या असंख्य उपनद्या आहेत.
तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये सिंचनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याचे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.जवळपास दीड हजार कार्यकर्त्या समोर संबोधित करत असताना के.सी.आर साहेबांनी देशाच्या प्रगतीसाठी भारत राष्ट्र समिती या पक्षात यावे,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते,माजी आमदार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक,प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समन्वयक, पक्षाचे आमदार,खासदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते..