KINWATTODAYSNEWS

श्री गुरुजी रुग्णालयाद्वारे अडीच कोटी रुपयांच्या कृत्रिम मॉड्युलर हात पायांचे वितरण संपन्न

*नांदेड*:दि.18.शहरातील नामांकित गुरुजी रुग्णालयाचा प्रथम वर्धापन दिना निमित्य विविध समाजातील विकलांग व्यक्तींना सामान्य लोकाप्रमाणे स्वकर्तृत्वावर उमेदीने जगता यावे यासाठी भारत परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे ही संस्था मोठा आधार बनली आहे.

या केंद्राच्या माध्यमातून नांदेड येथील श्री.गुरुजी रुग्णालयाच्या संयुक्त सहकार्यातून नांदेड येथे रोजी 2.5 कोटी रुपयांचा कृत्रिम कॅलीपर्स मॉड्युलर हातपाय व केली कॅलीपर्सचे वितरण करण्यात आले आहे.

याकरिता एम.एन.जी.एल.जी.ए. आय.एल.इंडिया लिमिटेड बीपीसीएल यांचे संयुक्त प्रकल्प सीएसआर सहाय्यता अंतर्गत अनुदान लाभले या शिबिरात महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांसह कर्नाटक व तेलंगाना राज्यातील दिव्यांगांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी *370* दिव्यांग बंधू भगिनींना कृत्रिम कृत्रिम मॉड्युलर हात पायांचे वेतन करण्यात आले यासोबतच श्री.गुरुजी रुग्णालयाच्या श्री.मथुरा शांती प्रतिष्ठान या नूतन व्यवस्थापनाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला हा सोळा श्री.सुहासराव हिरेमठ (ज्येष्ठ प्रचारक तथा अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य) श्री.राजन जोग राष्ट्रीय सचिव सेवा प्रकल्प भारत विकास परिषद,श्रीनिवास कुलकर्णी ज्येष्ठ कार्यकर्ता भारत विकास परिषद पुणे,मा.श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड,डॉक्टर सुधीर कोकरे,मा.जिल्हा संचालक राज्यसह नांदेड संस्थापक अध्यक्ष श्री.प्रसाद डॉ.लक्ष्मीकांत बजाज अध्यक्ष श्री.मथुरा शांती प्रतिष्ठान नांदेड,या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केला असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून व नूतन कार्यकारणीच्या वार्षिक उपलब्धी व पुढील वाटचाल याबाबत सविस्तर कथन करून रुग्ण सेवेकरिता दातृत्व भाव म्हणून सढळ हस्ते जमेल ते योगदान द्यावे असे अहवान केले आहे.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे यांनी आशा उपक्रमास त्यांच्या विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वस्त केले आहे.

इतर मान्यवरांनी औचित्यानुसार येथे मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप करताना श्री.सुहासराव हिरेमठ (संघाचे जेष्ठ प्रचारकता राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) यांनी असे सांगितले की समाजाने स्वतःच्या आमदानीतून काही टक्के खर्च हा सामाजिक बांधिलकी म्हणून करावा जेणेकरून गरजवंतांना योग्य त्या सोयी सुविधा मिळू शकतील संवेदनशील समाज हा सदृढ समाज असतो आणि तेव्हाच बलशाली भारताचे स्वप्न साकार होईलअसेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी भारत विकास परिषदेचे श्री.विनायक खटावकर श्री.राजन जोशी,श्रीनिवास कुलकर्णी, सोहन काणे,राजन देशपांडे, राजाभाऊ कदम,वासुदेव कालारा आणि शर्माजी हे उपस्थित होते.

तसेच नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेचे डॉ.सुधीर कोकरे डॉ.लक्ष्मीकांत बजाज डॉ. तुंगेनवार,डॉ.अतुल काबरा, डॉ,संजय पतंगे,ड्रा,शैलेश कुलकर्णी,श्री,अमोल आंबेकर, या संचालक मंडळाने उपस्थित लावले होती तसेच अवयव जोडणी तज्ञ् म्हणून श्री.वासुदेव कालरा,प्रशांत सातपुते,विजय गोरे,शांतनु नायक, विक्रम महाडिक,संजय शर्मा,व बोरगावकर,आदीनी काम पाहिले आहे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अर्चना बजाज यांनी तर सूत्रसंचालन डॉ. शेखर चौधरी यांनी केले आहे.

ऋणनिर्देश डॉ. संजय पतंगे यांनी व्यक्त केला सदरची शिबिर यशस्वी करीता श्री.गुरुजी सर्वाधिकारी कर्मचारी व डॉक्टरच्या समूहाणे गेले पंधरा दिवस थक परिश्रम करून हा उपक्रम यशस्वी रित्या पार केला आहे.

अशी माहिती मा संजय बजाज श्री.गुरुजी नांदेड व्यवस्थापक नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे

64 Views
बातमी शेअर करा