*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:19.जागतिक पातळीवर दिनांक 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो.यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची थिम आम्ही कटीबध्द आहोत ही आहे. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 मे ते 28 मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे,अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी-परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे.
या पार्श्वभूमीवर या दिनाच्या औचित्य साधून जिल्हयात रॅली,चर्चासत्रे, समारंभ,प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, समाजम आदी व्यापक स्वरूपात जनजागृती सप्ताह जाबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे.यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण,महिला व बाल कल्याण विभाग, उमेद तसेच विविध घटकांचा समन्वय साधून ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
तरी सर्व ग्राम पंचायतीमधून अशा वर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,शिक्षिका,महिला बचत गट यांनी पुढाकार घेवून मोठया प्रमाणत या सप्ताह निमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर माहिती देवून जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे