KINWATTODAYSNEWS

नांदेड येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.15. शहारातील निष्काम सेवा प्रतिष्ठान नांदेड च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व संस्थेचे अ.सदस्य इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त (दि.१५) मे रोजी नांदेड शहरातील गाडीवाले बचनकौर चौक बडपुरा गुरूद्वारा गेट नं.४,शहरात मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नेत्र तपासणी शिबिरात तब्बल 145 रुग्णांनी लाभ घेतला तर 30 ते 40 अत्यावश्यक रूग्णांना त्यांच्या गरजेनुसार लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड च्या वतीने मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात येणारआहे.
शहर जिल्हाध्यक्ष नांदेड सोशल मीडिया काँग्रेस तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस इंजि.सरदार हरजिंदर सिंघ संधू यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आमदार मोहन अण्णा हंबर्डे,नरेंद्र दादा चव्हाण,कारखान्याचे उपाध्यक्ष कल्याणकर
मामा,ठान सिंघ बुंगई गुरूद्वारा बोर्ड अधिक्षक,पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संघटक ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार बापू गायकर,
डॉ.अर्चना बजाज,डॉ.आडशिया कौसर माजी सभापती महिला व बालकल्याण,देवेंद्र सिंह मोटारवाले सामाजिक कार्यकर्ते, दीपक सिंघ हजुरिया सामाजिक कार्यकर्ते आधी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदरील शिबिराचे आयोजक संजीवकुमार गायकवाड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष नांदेड,राजकमल सिंघ गाडीवाले शहर जिल्हाध्यक्ष राहूल गांधी विचार मंच,निष्काम सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष राज कमल सिंग गाडीवाले,सुनील खिल्लारे, कामाजी अटकोरे,जालिंदर नरवाडे,अनिल थोरात,केरसिंघ, हरबंस सिंघ वासरिकर,नारायण सिघ वासरिकर,हुकम सिंघ, बलवंतसिंघ गाडिवाले, यांनी शिबिराचे आयोजन केले.

यावेळी इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांना अनेक चाहत्यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार,शाल श्रीफळ देऊन पेढा भरून संपूर्ण दिवसभर, रात्री उशिरापर्यंत शहरात विविध ठिकाणची दुकाने प्रतिष्ठाने, वेगवेगळ्या संघटना,वगैरे ठिकाणी बोलावून विविध उपक्रम राबवत अभिष्टचिंतनच्या, विविध माध्यमांद्वारे अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, सरचिटणीस तथा जेष्ठ पत्रकार संजय कहाळेकर,पांडुरंग सोनकांबळे सह मान्यवरांची उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरु बच्चन सिंघ सर यांनी केले तर आभार अर्जुन सिंघ मुनीम यांनी मानले

204 Views
बातमी शेअर करा