नांदेड : नांदेड जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत माहविकास आघाडीने 9 जागा जिंकत बहुमत सिद्ध केले आहे. भाजपला 6 जागी यश मिळाले असून ईश्वरी चिठ्ठीने भाजपला आज साथ दिली परंतु सत्ता स्थापन करता आली नाही.
बहुचर्चित नांदेड फेडरेशनची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कल दिनांक 14 मे रोजी 13 जागेसाठी मतदान घेण्यात आले. तब्बल 99 टक्के मतदान झाले होते. दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. काल घेण्यात आलेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. यात काँगेस माहाविकास आघाडीने 9 जागांवर विजय मिळविला आहे तर भाजपला 6 जागा जिंकता आल्या. पैकी दोन जागा ईश्वरी चिठ्ठी ने भाजपाच्या पदरात टाकल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत गोणे 23 मतांनी विजयी झाले आहेत. प्रदीप पाटील 17, उत्तम राठोड 09, रामलु इलतेपवार बिनविरोध देगलुर, सौ. अनिता येवले 109, मुकुंद जवळगावकर 123, शाहुराज गायकवाड 135, भारत रयापनवाड 126 तर साजेदा बेगम शौकत खान 128 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे मिलिंद देशमुख 20 मतांनी विजयी झाले आहेत. प्रताप सोळंके 06, दिगंबर पवळे 08 मताने विजयी झाले. रामराव सूर्यवंशी बिनविरोध तर मनोहर भोसीकर आणि उमाकांत दबडे हे ईश्वरी चिठ्ठीविजयी ठरले. ईश्वरी चिठ्ठीमुळे भाजपाच्या विजयी उमेदवारांचा आकडा 6 वर पोहचला आहे.
महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला तर माजी मंत्री डी पी सावंत, आ. मोहन अण्णा हंबर्डे, माजी सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण,युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
Amarnath Rajurkar