KINWATTODAYSNEWS

गोकुंदा ग्रामपंचायतचे रहिवासी नसलेल्या व ग्रामसभेत नाहक हस्तक्षेप करून सभा उधळून लावणाऱ्या लोकांवर ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद करण्याची मागणी

किनवट प्रतिनिधी
किनवट तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायतच्या विविध उपसमित्यांची निवड करण्यासाठी दोन वेळा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु गोकुंदा ग्रामपंचायतचे रहिवासी नसलेले काही विघ्नसंतोषी ग्रामसभेत गोंधळ घालून दहशत निर्माण करत आहेत.गोकुंदा ग्रामपंचायतचे रहिवासी नसलेल्या व ग्रामसभेत नाहक हस्तक्षेप करून सभा उधळून लावणाऱ्या लोकांवर ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद करण्याची मागणी गोकुंदा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे

निवेदनात नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गोकुंद्याची ओळख आहे. गोकुंदा येथे सर्वच जातीधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने व बंधूभावाने राहतात. गोकुंदा गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने ग्रामपंचायत अंतर्गत उपसमित्या गठीत करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा )समिती निवड करण्यासाठी गोकुंदा येथे दि 17 एप्रिल व दि 30 एप्रिल 2023 रोजी असे दोन वेळा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु सभेचे आयोजन केल्यानंतर गोकुंदा ग्रामपंचायतचे रहिवासी नसलेले काही उपद्रवी नागरिक ग्रामसभेत हस्तक्षेप करून गोंधळ घालत आहेत अशा विघ्न संतोषी लोकांमुळे ग्रामसभेच्या उपसमित्यांची निवड रखडत असून वारंवार सभा बरखास्त करणे भाग पडत आहे.ग्रामपंचायत अंतर्गत पेसा समिती ही आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण समिती मानली जाते. परंतु पेसा समिती गठीत होऊ न देता आदिवासी समाजाचा विकास रोखणे या हेतूने गोकुंदा ग्रामपंचायत रहिवासी नसलेले काही उपद्रवी लोक जाणीवपूर्वक ग्रामसभेत गोंधळ घालून दहशत निर्माण करत आहेत. त्यांच्या सततच्या अडथळ्यामुळे उप समित्यांची निवड होणे दुरापास्त बनले आहे त्यामुळे गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समुदायाचा विकास रोखण्याच्या हेतूने ग्रामसभेत गोंधळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या उपद्रवी लोकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करावी तसेच यापुढील ग्रामसभा शांततेत होण्याच्या दृष्टीने व पेसा समिती गठीत करण्याच्या अनुषंगाने पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी गोकुंदा येथील रहिवासी प्रा किशन मिरासे, जे टी पाटील, आदिवासी मोंर्चा चे नेते जितेंद्र अ . कुलसंगे, जयवंत बोंबले यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे

204 Views
बातमी शेअर करा