KINWATTODAYSNEWS

*तथागत भगवान बुद्धांच्या जयंती निमित्त भव्य धम्म ज्योत कॅण्डल रॅली संपन्न…* *धर्माबादेत धम्ममय वातावरणात,विविध उपक्रमातून बुद्ध जयंती साजरी.*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.7. जिल्यातील धर्माबाद येथे तथागत भगवान बुद्धांच्या जयंती निमित्त धर्माबाद शहरांमध्ये विविध नगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील सिद्धार्थ नगर बाळापुर या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहार प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.प्रथम सत्रात भीम जयंती मंडळाच्या वतीने पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.द्वितीय सत्रात तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन करून सामुदायिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. जयंती मंडळाचे अध्यक्ष कीर्तीराज गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.

सामुदायिक त्रिशरण,पंचशील
चंद्रभीम हौजेकर (पत्रकार )यांनी पूजा विधी संपन्न केली.भीम जयंती मंडळाच्या वतीने खीरदान व उपासक उपासिका दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून प्राप्त झालेल्या विविध स्वरूपाच्या माध्यमातून सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रभीम हौजेकर (पत्रकार )यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव खंडेलोटे यांनी मानले.
विश्वशांती बुद्धविहाराच्या प्रांगणापासून तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची धर्माबाद मार्गे नटराज चौक,नरेंद्र चौक,नेहरू चौक,नगरपालिका चौक, पानसरे चौक या मार्गे बाळापुर रोड मार्गे विश्वशांती बुद्धाच्या प्रांगणात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक-उपासिका बालक बालिका,विश्वशांती महिला मंडळ, प्रज्ञा संघातील नऊ तरुण बांधव,भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी व बुद्ध जयंती चे सर्व पदाधिकारी सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मिरवणुकीमध्ये सामील झाले होते.

तथागतांच्या बुद्ध गीताने व बुद्धम् शरणम् गच्छामिच्या निनादात संपूर्ण धर्माबाद शहर शांततेच्या मार्गात धम्मज्योत कॅण्डल रॅली काढून तथागत बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमाई नगर,रामनगर,डॉ.आंबेडकर नगर रत्नाळी,रसिक नगर, फुलेनगर,हर्ष नगर,सरस्वती नगर,सिद्धार्थ नगर बाळापुर,शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी आदी भागामध्ये तथागतांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करून बुद्ध जयंती साजरी करण्यात आले. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने विशेष सहकार्य केल्याने भीम जयंती मंडळाच्या वतीने सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रथम,द्वितीय आणि तृतीय सत्रातील संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
कीर्तीराज गायकवाड,प्रेम घाटे,अमोल जाधव,पत्रकार
चंद्रभीम हौजेकर,भीमराव खंडेलोटे,साहेबराव सोनकांबळे, गंगाधर कोठारे,चंद्रमणी गायकवाड,अजय सूर्यवंशी, स्वप्निल सोनकांबळे,गौतम जाधव,अमोल जाधव,राष्ट्रपाल घाटे,विठ्ठल वाघमारे,सचिन पत्रे , दवीन घाटे,अनमोल गायकवाड, अजय सूर्यवंशी,यासह अनेकांनी
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

71 Views
बातमी शेअर करा