किनवट प्रतिनिधी: किनवट शहरातील सर्वच पुतळ्याचे सुशोभितरण बरेच दिवसापासून रखडलेले आहे. पुतळ्याच्या आसपास व सभोवताल अनेक अतिक्रमणे वाढलेले असून अतिक्रमणाचा बंदोबस्त करण्यात यावा असे मी अनेक वेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून नगरपालिकेच्या लक्षात आणून दिले.
परंतु या बाबीकडे नगरपालिका लक्ष देत नाही. याबाबतचा ठरावही पारित केलेला आहे. परंतु याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नव्हते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे चौकात गटारगंगा साचून राहते व अनेक अतिक्रमणे वाढलेली आहेत. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या अत्यावश्यक प्रश्नाची आता प्रशासनाने त्वरित दखल घेऊन तो लवकरात लवकर सोडवावा.
किनवट मधील प्रत्येक पुतळ्याच्या भोवताल सुशोभीकरण करून स्वच्छता निर्माण करावी आणि पुतळा आणि पुतळ्या चा परिसर हा अतिक्रमण व टवाळखोरांपासून अबाधित ठेवावे असे न झाल्यास एक मोठे आंदोलन उभा करावी लागेल.असे विरोधी पक्षनेते जाहीरोद्दीन खान माजी नगर परिषद सदस्य किनवट यांनी आमच्या कडे बोलून दाखविले.
शहरातील प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण करून अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन उभे करू-जहिरोद्दीन खान (माजी विरोधी पक्ष नेता न.पा.)
83 Views