माहूर (प्रतिनिधी )माहूर येथील आघाडीच्या पत्रकार तथा भाजपाच्या झुंजार कार्यकर्त्या सौ.पद्मजा जयंत गि-हे यांची नांदेड जिल्हा भाजपा पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्ष पदी (ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे.
महीला संघटन वाढीसह महीला सबलिकरणाचे दृष्टीने बौध्दीक कौशल्याचा वापर करून समर्पक भावनेने कार्य करण्याची पद्मजा गि-हे यांचेवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. दि.20 जून रोजी नांदेड येथे संपन्न झालेल्या बैठकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे,जिल्हाध्यक्ष व्यंकटेश गोजेगावकर, प्रविण साले, ठक्करवाड, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे, शितलताई भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.पद्मजा जयंत गि-हे यांची नियुक्ती करण्यात आहे.
भाजपाचे युवानेते अॅड.रमण जायभाये,सुमित राठोड, समर भाऊ त्रिपाठी,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,शहराध्यक्ष गोपु महामुने,ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले,अनिल वाघमारे,नंदकुमार जोशी, जयंत गि- हे,राजू दराडे,राम दातीर,पवन कोंडे, संजय पेंदोर, छायाताई राठोड ,शोभाताई महामुने,अश्विनी ताई पाटील,अर्चनाताई दराडे, दीपमाला अग्रहरी ,अपर्णा पाटील आदिं मान्यवरांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.