KINWATTODAYSNEWS

उप विभागीय मुख्यालयी ध्वजारोहण व वनहक्क प्रमाणपत्र वाटपाने महाराष्ट दिन उत्साहात साजरा

किनवट : येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 63 वा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण व वनहक्क प्रमाणपत्र वाटपाने महाराष्ट दिन उत्साहात साजरा झाला.
यावेळी आमदार भीमराव केराम यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या भाषणानंतर अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्‍क मान्‍यता ) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि नियम २०१२ अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय वनहक्‍क समिती नांदेड यांचेकडुन मंजुर झालेले एकुण ४२ वैयक्तीक वनहक्‍क दावे मालकी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी सहायक जिल्‍हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (भाप्रसे), तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, सहायक उप वन संरक्षक जी. डी. ग‍िरी, गट विकास अधिकारी पुरुषोत्‍तम वैष्‍णव, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार एन.ए. शेख, अशोक कांबळे , शिवकांता होनवडजकर, महसूल सहायक एस. जी. मुपडे, वनहक्‍क शाखा तालुका व्‍यवस्‍थापक महेश राठोड, सविता वानोळे, सहायक तेजस चव्‍हाण, निवृत्त तहसिलदार उत्तम कागणे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, के. मूर्ती, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, माजी उप सभापती गजानन कोल्हे पाटील, दत्ता आडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप केंद्रे, अनिल तिरमनवार, उत्तम जाधव , निळकंठ कातले, संतोष मरसकोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहनानंतर रेणुकादेवी स्वरताल संगीत महाविद्यालयाच्या प्रा. आम्रपाली वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे यांच्या साथीने शर्वरी गिरीष पत्की, ऋचा रमाकांत चक्रवार, अदिश्री गिरीष पत्की, इशिता शिरीष पत्की, वैष्णवी येंबरवार व आकांक्षा प्रदीप कांबळे यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत गाईले. पोलिस उप निरीक्षक मिथून सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने सलामी दिली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राम बुसमवार यांनी उद्घोषणा दिल्या.
ध्वजस्तंभाजवळ महेंद्र मेश्राम यांनी महाराष्ट्र दिनाचा संदेश देणारी रेखाटलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (भाप्रसे) यांचे हस्ते, तहसिल कार्यालयात व नगर परिषदेत तहसिलदार व प्रशासक तथा मुख्यधिकारी डॉ. मृणाल जाधव यांचे हस्ते, पंचायत समिती येथे प्रशासक तथा गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांचे हस्ते, गट साधन केंद्र येथे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांचे हस्ते , एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

130 Views
बातमी शेअर करा