KINWATTODAYSNEWS

नांदेड जिल्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली | माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपलं वर्चस्व कायम

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
नांदेड जिल्हयातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे.

या चार बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेस प्रणित पॅनलने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे.तसंच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं वर्चस्व कायम देखील ठेवलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोकर मतदारसंघातील बाजार समितीत अशोक चव्हाण यांनी आपला गड शाबूत ठेवला आहे.एकूण १८ पैकी १३ जागी काँग्रेस,तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहे.

तसंच भाजपाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं. पहिल्यांदा बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलेल्या बीआरएस पक्षाला भोकरमध्ये मात्र अपयश आलं आहे. बीआरएस पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.

हिमायतनगर बाजार समितीत काँगेसला एकहाती सत्ता मिळाली.१८ पैकी १८ जागा काँगेसने जिंकल्या.विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा इथे दारुण पराभव झाला.नायगाव बाजार समिती बीनविरोध निघाली.१२ काँग्रेस, तर भाजपला ६ जागा मिळाल्या. कुंटूर बाजार समितीत काँगेसला १३ तर भाजप समर्थक पॅनलला पाच जागा मिळाल्या.एकंदरीत चारही बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश आलं आहे.

विशेष म्हणजे या निवडणूकसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

दोन्ही पक्षातील नेते तळ ठोकून होते. दरम्यान नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतित काँग्रेस 12. राष्ट्रवादी 3, ठाकरे गट 2 तर 1 अपक्ष निवडून आले असून अपक्ष यांनी पण महा विकास आघाडी ला समर्थन दिले आहे.

यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती.या निकालाकडे सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं होते पण भाजप -शिंदे गटाचा सुपडा साफ झाला असून यांना खाते ही उघडता आले नाही.ही निवडणूक भाजपा चे खा.प्रताप पाटील चिखलीकर,खा.हेमंत पाटील व आ.बालाजी कल्याणकर यांनी प्रतिष्टेची केली होती पण जिल्यात मतदार राज्यांनी महाविकास आघाडी च्या बाजूने आपला कोल दिला असल्यामीळे जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मतदारांनी महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम ठेवले आहे.

150 Views
बातमी शेअर करा